Sunday, October 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedयेरवडा येथील मागासवर्गीय गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह येथे प्रवेश प्रक्रिया सुरू

येरवडा येथील मागासवर्गीय गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह येथे प्रवेश प्रक्रिया सुरू

पुणे, दि. 21: येरवडा येथील मागासवर्गीय गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह (नवीन) येथे सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून इच्छुकांकडून प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

इयत्ता 10 वी नंतर कनिष्ठ महाविद्यालय, तंत्रनिकेतन, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना या वसतिगृहात मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. वसतिगृह प्रवेश हा प्रवर्गनिहाय गुणवत्तेनुसार असणार आहे. वसतिगृहात विनामुल्य निवास, आंथरूण, पांघरुण, भोजन, पुस्तके, स्टेशनरी, शैक्षणिक बाबींकरीता आर्थिक सहाय्य, दरमहा निर्वाह भत्ता आदी सुविधा पुरविण्यात येणार आहे.

मागासवर्गीय गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह (नविन), गोल्फ क्लब, येरवडा-6 येथे प्रवेश अर्ज उपलब्ध आहेत. तरी इच्छुकांनी वसतिगृहातून प्रवेश अर्ज घेऊन जावे, असे आवाहनही मागासवर्गीय गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृहाचे अधीक्षकांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments