पुणे, दिः २२ मेः सुस रोड येथील ध्रुव ग्लोबल स्कूलचा १२वींच्या पहिल्या तुकडीच्या (सी.बी.एस.ई) परीक्षेत १०० टक्के निकाला लागला आहे. तसेच, आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवत १०वींचा सुद्धा निकाल १०० टक्के लागला आहे. या यशाबद्दल चेअरमन डॉ. संजय मालपाणी, यशोवर्धन मालपाणी आणि प्राचार्या संगीता राऊतजी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
१२वींच्या विज्ञान, वाणिज्य आणि मानवता विषयात विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ कामगिरी केली आहे. विज्ञान शाखेत नील चितळे ९६.२ टक्के, चिन्मयी आळंदकर ९५.२ टक्के, ए.एस लोकेश्वर ८८.६ टक्के मिळाले आहेत. वाणिज्य शाखेत पवनी मिश्रा ८९ टक्के व दक्षिता जव्हार हिने ८६ टक्के मिळविले आहेत. तसेच मानवता शाखेत मृण्मयी आळंदकर ९७.२ टक्के, गायत्री ठाकूर ९७ टक्के आणि मृण्मयी कोरे ९५.६ टक्के मिळाले आहेत. विशेष उल्लेखनीय म्हणजे कोशीन रैना ला ९५.४ टक्के मिळाले. शाळेच्या तीन विद्यार्थ्यांनी आपापल्या विषयात १०० पैकी १०० गुण मिळविले आहेत. यात गायत्री ठाकूर ने इतिहास, मृण्मयी कोरे हिने मास मीडिया आणि चिन्मयी आळंदकर हिने संस्कृत विषयात यश मिळविले.
शाळेचा १०वीं चा निकाल ही उत्कृष्ठ होता. तन्वी भूषण ९६.४ टक्के, अचल गुप्ता ९६ टक्के आणि सुभ्रांशु गान ९५.२ टक्के मिळाले आहे. तसेच अचल गुप्ता ने जर्मनी, तन्वी भूषण, उमंग चिंचोरे आणि गौरी मोहिते यांनी संस्कृत व तन्वी भूषण हिने सामाजिक विज्ञानात १०० पैकी १०० गुण मिळविले आहेत.
संगीता राऊतजी म्हणाल्या, विद्यार्थ्यांचे अथक परिश्रम, शिक्षकांचे अखंड सहकार्य आणि शालेय नेतृत्वाच्या दूरदर्शी मार्गदर्शनामुळे हे परिणाम समोर आले आहेत.
ध्रुव ग्लोबल स्कूलचा दहावीसह बारावीच्या पहिल्या बॅचचा निकाल १०० टक्के
RELATED ARTICLES


