Thursday, October 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedसॅमसंग ‘सॉल्व्‍ह फॉर टूमारो'कडून शालेय विद्यार्थ्‍यांमध्‍ये समस्‍या-निवारण कौशल्‍ये विकसित करण्‍यासाठी पहिल्‍या डिझाइन...

सॅमसंग ‘सॉल्व्‍ह फॉर टूमारो’कडून शालेय विद्यार्थ्‍यांमध्‍ये समस्‍या-निवारण कौशल्‍ये विकसित करण्‍यासाठी पहिल्‍या डिझाइन थिंकिंग वर्कशॉपचे आयोजन

गुरूग्राम, भारत – २० मे २०२४: सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने देशातील निवडक शाळांमध्‍ये पहिलेच डिझाइन थिंकिंग व प्रशिक्षण वर्कशॉपचे आयोजन केले आहे. सॅमसंग ‘सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो’ प्रोग्रामचा भाग असलेला हा अद्वितीय उपक्रम ह्युमन-सेंटर्ड डिझाइन थिंकिंग फ्रेमवर्कच्‍या माध्‍यमातून विद्यार्थ्‍यांमध्‍ये समस्‍या-निवारण, महत्त्वपूर्ण विचारसरणी, प्रोबिंग (तपासणी) आणि सर्जनशीलता अशी महत्त्वपूर्ण कौशल्‍ये बिंबवण्‍यावर लक्ष केंद्रित करतो. राष्‍ट्रीय शिक्षण व नाविन्‍यपूर्ण स्‍पर्धेचा भावी पिढीमध्‍ये नाविन्‍यता संस्‍कृतीला चालना देण्‍याचा मनसुबा आहे.

विशेषत: भारतासाठी डिझाइन करण्‍यात आलेला हा एक-दिवसीय वर्कशॉप विद्यार्थ्‍यांना डिझाइन थिंकिंग संकल्‍पना आत्‍मसात करण्‍यास, तसेच वास्‍तविक विश्‍वातील समस्‍यांना ओळखून त्‍यांचे निवारण करण्‍यास प्रेरित करतो. शैक्षणिक अभ्‍यासक्रमाचा भाग म्‍हणून ह्युमन-सेंटर्ड डिझाइन थिंकिंग समस्‍या-निवारणासाठी शक्तिशाली माध्‍यम आहे. डिझाइन विश्‍वातील प्रक्रिया व टूल्‍सचा वापर करत ह्युमन-सेंटर्ड डिझाइन फ्रेमवर्क वापरकर्त्‍यांचे जीवन सुधारण्‍यासाठी सहानुभूती, व्‍याख्‍या, विचार, प्रोटोटाइपिंग आणि सोल्‍यूशनचे परीक्षण यावर भर देतो.

“सॅमसंग सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो भावी पिढीला सक्षम करण्‍याच्‍या आणि देशात नाविन्‍यतेची इकोसिस्टम तयार करण्‍याच्‍या आमच्‍या दृष्टिकोनाचा भाग आहे. आमचा विश्‍वास आहे की भावी पिढी नाविन्‍यतेचे ध्‍वजवाहक आहेत आणि तरूणांपासूनच मार्गदर्शनाची गरज आहे. डिझाइन थिंकिंग वर्कशॉप्‍स यंदा १० शाळांमध्‍ये पायलट म्‍हणून सादर करण्‍यात आले आहेत, ज्‍याद्वारे तरूण विद्यार्थ्‍यांना प्रकल्‍पांची अंमलबजावणी करण्‍यास प्रेरित करण्‍यात येईल, ज्‍यामध्‍ये समस्‍या-निवारण, सहयोग व सर्जनशील विचारसरणी यांचा समावेश आहे. या ऑफलाइन सत्रांच्‍या माध्‍यमातून शालेय विद्यार्थ्‍यांना मुलभूत बाबींबाबत शंका विचारण्‍याची, वास्‍तविक विश्‍वातील समस्‍यांना ओळखण्‍याची आणि तंत्रज्ञान-आधारित सोल्‍यूशन्‍सचा प्रस्‍ताव मांडण्‍याची अद्वितीय संधी मिळेल,” असे सॅमसंग साऊथवेस्‍ट एशियाचे कॉर्पोरेट उपाध्‍यक्ष एसपी चुन म्‍हणाले.

एक-दिवसीय डिझाइन थिंकिंग वर्कशॉपची कार्यपद्धती पुढीलप्रमाणे:

– डिझाइन थिंकिंगच्‍या मुलभूत संकल्‍पनांचे सादरीकरण

– डिझाइन थिंकिंग प्रक्रियेच्‍या पाच पायऱ्या

1. सहानुभूती: विद्यार्थी रोल-प्‍ले व मुलाखतींमध्‍ये सामील होतात, त्‍यांच्‍यावर वास्‍तविक विश्‍वातील समस्‍यांमुळे प्रभावित झालेल्‍या विविध युजर प्रकारांची जबाबदारी सोपवली जाते, त्‍यांचे अनुभव व पैलूंचा शोध घेतात.

2. परिभाषित करणे: एकत्रित नोट्स व मार्गदर्शित चर्चासत्रांच्‍या माध्‍यमातून विद्यार्थी प्रॉब्‍लेम ट्री सारख्‍या टूल्‍सचा वापर करत मुलभूत समस्‍यांना परिभाषित करतात, हस्‍तक्षेपासाठी मूळ कारणे व क्षेत्रांना ओळखतात.

3. विचारसरणी: सर्जनशीलतेला प्रेरित करत विद्यार्थी समूह सहयोगाच्‍या माध्‍यमातून परस्‍पर संलग्‍न असलेल्‍या सोल्‍यूशन्‍समध्‍ये सुधारणा करण्‍यासोबत अंतिम रूप देण्‍याप्रती सर्व बाजूने सर्व प्रकारच्‍या संकल्‍पनांचा अवलंब करतात आणि विविध सोल्‍यूशन्‍सचा विचार करतात.

4. प्रोटोटाइप: विद्यार्थी प्रोटोटाइपिंग पद्धतींचा आढावा घेतात आणि त्‍यांच्‍या निवडलेल्‍या सोल्‍यूशन्‍सना मूर्त स्‍टोरीबोर्ड्समध्‍ये रूपांरित करतात, अभिप्राय आणि त्‍यामधील सुधारणेसाठी त्‍यांच्‍या संकल्‍पनांना सादर करतात.

5. चाचणी: सोल्‍यूशन्‍स निर्माण केल्‍यानंतर अभिप्राय यंत्रणा सुरू होते, जेथे वापरकर्त्‍याच्‍या अनुभवाचा विचार केला जातो आणि मिळालेल्‍या प्रतिसादावर आधारित समाधान पातळ्यांनुसार त्‍यामध्‍ये सुधारणा केली जाते.

सॅमसंग ‘सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो’ तरूण विचारवंतांमध्‍ये समस्‍या-निवारण, सहयोग आणि सर्जनशील विचारसरणीप्रती आवड जागृत करतो. २०१० मध्‍ये प्रथम यूएसमध्‍ये लाँच करण्‍यात आलेला उपक्रम सॉल्व्‍ह फॉर टूमारो सध्‍या जगभरातील ६३ देशांमध्‍ये कार्यरत आहे आणि जगभरातील २.३ दशलक्षहून अधिक तरूणांनी या उपक्रमामध्‍ये सहभाग घेतला आहे.

सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍सचा जागतिक सीएसआर दृष्टिकोन ‘टूगेदर फॉर टूमारो! अनेबलिंग पीपल’ जगभरातील तरूणांना शिक्षण प्रदान करण्‍यासोबत भावी लीडर्सना सक्षम करण्‍याप्रती कटिबद्ध आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments