Thursday, October 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedघ शिक्षा वर्गाचा शनिवारी समारोप🚩 ▪️सोलापूरकरांनी उपस्थित राहण्याचे रा.स्व.संघाचे...

घ शिक्षा वर्गाचा शनिवारी समारोप🚩 ▪️सोलापूरकरांनी उपस्थित राहण्याचे रा.स्व.संघाचे आवाहन ▪️

सोलापूर – येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघ शिक्षा वर्गाचा समारोप शनिवार दि.१ जून रोजी होणार आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघ शिक्षा वर्ग सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशाला येथे सुरू आहे. या प्रशिक्षण वर्गात सहभागी होणाऱ्या स्वयंसेवक बंधूंना देशभक्ती व समाजकार्याचे तसेच सेवाभाव जोपासण्याचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षण वर्गाच्या पंधरा दिवसांच्या कालावधीत स्वयंसेवकांनी घेतलेल्या विविध प्रशिक्षणाचे प्रकटीकरण समारोप समारंभात केले जाते. शनिवार दिनांक १ जून रोजी सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या या समारोप कार्यक्रमात सीएमडी वामसी लॅब लिमिटेडचे मदन केशवा रेड्डी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.रा.स्व. संघाचे प्रांत संघचालक प्रा. सुरेश ( नाना) जाधव प्रमुख वक्ते म्हणून प्रशिक्षण वर्गातील स्वयंसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत.
शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या समारोप कार्यक्रमास हजर राहण्याचे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments