योगीश्वर याज्ञवल्क्य वैदिक पुरस्कार वितरण सोहळाश्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी दिनी सोमवार दि.११ डिसेंबर २०२३ रोजीशुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ : भालेराव, देवगावकर, शहरकर, कुंभार यांना यंदाचा पुरस्कारपुणे : शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाच्या वेदविद्या संवर्धन उपक्रमाअंतर्गत योगीश्वर याज्ञवल्क्य वैदिक पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सोमवार, दिनांक ११ डिसेंबर सायंकाळी ५ वाजता सारसबागेजवळील वेदशास्त्रोत्तेजक सभा येथे पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे, अशी माहिती वेद विद्या संवर्धन समितीचे अध्यक्ष डॉ. रवींद्र मुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.पत्रकार परिषदेला अध्यक्ष विलास देशपांडे, कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी, कार्यवाह श्रीकांत जोशी, कोषाध्यक्ष दिलीप संभूस, वेदमूर्ती आहिताग्नी सुधाकरपंत कुलकर्णी, डॉ. संजय देवडीकर यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे वैदिक संशोधन मंडळ पुणे चे संचालक सुब्रह्मण्यम वेरीवेंटी आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वेदाचार्य शांतारामजी भानोसे, नाशिक हे उपस्थित राहणार आहेत. निखिल भालेराव यांना योगीश्वर याज्ञवल्क्य पुरस्कार ( १५०००/- व मानपत्र), वेदांग शहरकर यांना आदर्श छात्र पुरस्कार, ( ११०००/- व मानपत्र), श्रीमती रत्नमाला गजानन जोशी स्मरणार्थ सेवारत्न पुरस्कार (१००००/- व मानपत्र) अरुण देवगावकर यांना देऊन ह.भ. प. बाळू कुंभार यांना ज्ञानेश्वरी प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.याशिवाय अथर्व हरदास, कौस्तुभ पाठक, प्रशांत जोशी, चिन्मय जोशी, अभय जोशी यांना छात्र पुरस्कार(प्रत्येकी २५००/-) प्रदान करण्यात येणार आहेत. या शिवाय दिनांक २२जानेवारी २४ रोजी अयोध्येत पुण्यातून रामजन्मभूमी स्थळी पूजेसाठी जाणाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार असून १०वी १२वी व इतर परीक्षेत उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके व शिष्यवृत्तीचे चेक वाटप होणार आहे.तरी सर्व पुणेकरांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
Share with
Tagged in :