नवी दिल्ली, 08 जून 2024: ग्राहक-प्रथम दृष्टिकोनाच्या अनुषंगाने, टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) ने आज नवी दिल्ली येथे “टोयोटा यू-ट्रस्ट” या ब्रँड नावाखाली, कंपनीच्या मालकीच्या पहिल्या टोयोटा युज्ड कार आउटलेट (टीयूसीओ) चे उद्घाटन केले, जे भारतात दुसरे आहे. उच्च-गुणवत्तेच्या आणि सुरक्षित युज्ड कार ऑफर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, टोयोटा यू-ट्रस्ट टोयोटा कार खरेदी आणि विक्री प्रक्रियेदरम्यान ग्राहकांना सुविधा, पारदर्शकता आणि मनःशांती देते. ही नवीन सुविधा 15,000 चौरस फुट क्षेत्रामध्ये पसरलेली आहे, ज्यामध्ये 20 हून अधिक टोयोटा सर्टिफाइड वेहिकल प्रदर्शित करण्याची क्षमता आहे.
टोयोटा वाहनांच्या खरेदी आणि विक्रीसाठी रिटेल टचपॉईंट म्हणून, सर्विस हिस्ट्री तपासणीसह कागदपत्रांची योग्य तपासणी केल्यानंतर, गुणवत्ता पातळी निश्चित करण्यासाठी टीयूसीओ मधील सर्व कारची टोयोटा ग्लोबल स्टँडर्ड्सवर आधारित सर्वसमावेशक 203-पॉइंटची तपासणी केली जाते. तपासणीमध्ये कठोर सुरक्षा, स्ट्रक्चरल रिजिडिटी आणि कार्यप्रदर्शन तपासणी यांचाही समावेश आहे. ‘MARU MARU’ सिग्नेचरसह, टोयोटासाठी खास ‘उच्च दर्जाच्या अचूक क्लीनिंग’ चे प्रतीक असलेला, टीयूसीओ व्यवसाय संपूर्ण भारतातील टोयोटाच्या ग्राहकांसाठी पारदर्शक आणि विश्वासार्ह युज्ड कार बाजारपेठ निर्माण करण्यासाठी टीकेएमच्या वचनबद्धतेला बळकटी देतो. शिवाय, टोयोटा यू-ट्रस्ट आउटलेट्स नवीन वाहन खरेदी करण्यासारखे वातावरण आणि ग्राहक अनुभवाची प्रतिकृती बनवण्याचा प्रयत्न करतात.
खरेदीदार उच्च-गुणवत्तेच्या टोयोटा मॉडेल्सच्या विविध प्रकारांमधून कार निवडू शकतात, जे संपूर्ण पारदर्शकता, त्रासमुक्त दस्तऐवजीकरण आणि वाजवी स्पर्धात्मक किंमतीची खात्री देते. डिजिटली इंटिग्रेटेड शोरूम वाहनांची संपूर्ण माहिती आणि मूल्यमापन देऊन ग्राहकांचा अनुभव वाढवते. याव्यतिरिक्त, ग्राहक टोयोटा यू-ट्रस्ट वेबसाइटद्वारे ‘व्हॅल्युएट युअर कार’ पर्याय निवडून त्यांच्या वाहनांचे ऑनलाइन मूल्यांकन करू शकतात. याशिवाय, विक्रीनंतरच्या सेवेकडे टोयोटाचा खरा ग्राहक केंद्रित दृष्टीकोन दाखवून, टीयूसीओ सर्टिफाइड युज्ड कार्सना देशभरातील कोणत्याही टोयोटा सेवा केंद्रांवर 30,000 किमी पर्यंतची वॉरंटी, किंवा 2 आणि 3 वर्षांपर्यंत मोफत सेवा ऑफर करतात.
टीयूसीओ विक्रेत्यांसाठी शांततापूर्ण आणि त्रास-मुक्त विक्री प्रक्रिया सुनिश्चित करून बाजारपेठेतील सर्वोत्तम किंमत ऑफर करते.
श्री ताकाशी ताकामिया, वाइस प्रेसिडेंट, टोयोटा किर्लोस्कर मोटर, यांनी युज्ड कारच्या व्यवसायावर कंपनीच्या वाढत्या फोकसबद्दल माहिती शेअर करताना सांगितले की, ” युज्ड कारचा व्यवसाय हा टोयोटाच्या संपूर्ण व्यवसाय आणि भारतातील वाढीच्या धोरणाचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे, जो आमच्या ‘मोबिलिटी फॉर ऑल’ या दृष्टीकोनाशीही जुळवून जोडलेला आहे. त्यामुळे, नवी दिल्लीतील आमच्या पहिल्या युज्ड कार आउटलेटच्या उद्घाटनासह टीयूसीओ चा विस्तार गुणवत्ता, विश्वासार्हता आणि ग्राहकांच्या समाधानासाठी आमच्या समर्पणाचे उदाहरण देतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे नवीन आउटलेट टोयोटा उत्पादने आणि आमच्या बेंचमार्क सेवा अनुभवाच्या मानकांना कायम ठेवते.
भारतीय युज्ड कार मार्केट 8% च्या सीएजीआर ने वाढण्याचा अंदाज आहे आणि हे सध्या नवीन कार मार्केटच्या 1.3 पट आहे, त्यामुळे या क्षेत्रामध्ये लक्षणीय वाढीची शक्यता आहे. आमचा दिल्लीतील टोयोटा कंपनीच्या मालकीच्या आउटलेटचा अलीकडील विस्तार आणि मोठ्या शहरांमध्ये आणखी आउटलेट्स उघडण्याची योजना, आमच्या ग्राहकांसाठी अखंड, पारदर्शक आणि विश्वासार्ह युज्ड कार मार्केट तयार करण्याच्या टीकेएम च्या धोरणाला अधोरेखित करते, ज्यामध्ये गुणवत्ता आणि सुरक्षा-केंद्रित नूतनीकरणावर भर दिला जातो.
कार्यक्रमाला उपस्थित, श्री अतुल सूद, प्रोजेक्ट वाइस प्रेसिडेंट, टोयोटा किर्लोस्कर मोटर म्हणाले, “नवी दिल्ली येथील टीयूसीओ सुविधेचे उद्घाटन टोयोटा किर्लोस्कर मोटरसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. सर्व मूल्यवर्धित सेवांसाठी एकाच वन-स्टॉप सोल्यूशनसह, ग्राहकांना त्यांच्या टोयोटा कार खरेदी आणि विक्रीसाठी विश्वासार्ह आणि पारदर्शक अनुभव देत, युज्ड कारच्या मार्केटमध्ये आमची उपस्थिती वाढवताना आम्हाला आनंद होत आहे.
प्रत्येक पूर्व-मालकीच्या वाहनाचे नूतनीकरण आमच्या विशेष केंद्रांवर टोयोटा जेन्युईन पार्ट्स वापरून आमच्या स्वतःच्या टेक्नीशियनकडून केले जाते. टोयोटा ग्लोबल स्टँडर्ड्सनुसार सर्वसमावेशक 203- पॉइंट तपासणी केली जाते, जे उच्च गुणवत्ता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करते. ही बांधिलकी टोयोटाच्या त्रास-मुक्त विक्री-पश्चात सेवा समर्थनाच्या खात्रीमुळे आणखी मजबूत झाली आहे, जे एक अखंड आणि आनंददायी मालकी अनुभव सुनिश्चित करते.”
टोयोटा किर्लोस्कर मोटरने 2022 मध्ये बंगळुरूमध्ये पहिल्या सुविधेचे उद्घाटन करून 2022 मध्ये युज्ड कार व्यवसायात प्रवेश केला, त्यामुळे ग्राहकांना पूर्णपणे ओईएम (ओरिजिनल इक्विपमेंट मॅनुफॅक्चरर) नूतनीकरण केलेल्या कार ऑफर करणारी टीकेएम ही भारतातील पहिली ऑटो उत्पादक कंपनी बनली आहे.


