Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedशांतीलाल सुरतवाला हे तळागाळातील कार्यकर्ते ‘असा महापौर...

शांतीलाल सुरतवाला हे तळागाळातील कार्यकर्ते ‘असा महापौर पुण्याचा’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : स्वतः अनुभवलेले पुणे शहरातील आठवणीसह गणेश मंडळाचा कार्यकर्ता, नगरसेवक ते महापौर असे अनेक पदे शांतीलाल सुरतवाला यांनी भूषवले आहेत. या प्रवासातून त्यांना आलेले अनुभव ‘असा महापौर पुण्याचा’ या पुस्तकातुन मांडल्या आहेत. शांतीलाल सुरतवाला हे तळागाळातील कार्यकर्ते आहेत. हरहुन्नरी, बहुरूपी, धडाडीचा कार्यकर्ता असे व्यक्तिमत्त्व त्यांचे आहे. त्यांच्या या आठवणी कायम पुणेकरांच्या लक्षात राहतील. आठवणीचे हे साठवण असून आता त्यांनी आत्मचरित्र लिहावे. त्यांच्याकडे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि जुन्या पुणे शहराच्या आठवणी खूप आहे, त्यांनी लिहीत राहावे, असा सल्ला सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी दिला.
सुरतवाला बिझनेस ग्रूप लिमिटेडतर्फे प्रकाशित व पुण्याचे माजी महापौर शांतीलाल सुरतवाला लिखित ‘असा महापौर पुण्याचा’ या पुस्तकाचे प्रकाशन सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते सोमवारी एस. एम. जोशी फौंडेशन हॉल येथे झाले. त्यावेळी डॉ. शां. ब. मुजुमदार बोलत होते.पुण्याचे माजी महापौर ‘शांतीलाल सुरतवाला’ यांच्या आठवणी आणि अनुभव कथन यांचा समावेश पुस्तकात आहे. एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. ज्येष्ठ इतिहासकार पांडुरंग बलकवडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कोठाडिया, हेमंत सुरतवाला, बाबूगेनू गणेश मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ पवार, सुरेशभाई सुरतवाला आदी उपस्थित होते.
डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले, पुण्याचे वर्णन अनेकांनी केलेले आहे. प्रकाशनाचे आणि पुस्तकाचे शहर आता ओळखले जात आहे. शांतीलाल सुरतवाला यांनी आपल्या आठवणीतून शहराचा विकास, पुण्याची जुनी माहितीचा उलगडा केला आहे. सिगारेटचा किस्से सांगून त्यांनी कोणकोणते कंपनीचे सिगरेट ओढली याची खरी माहिती त्यांनी यात सांगितली. त्यानंतर डॉक्टरांनी कर्करोगाचे निदान झाले असल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी ते व्यसन सोडून दिले, ही सत्य माहिती यावेळी देखील या पुस्तकातून सांगितलेली आहे. शरद पवारांचा सच्चा कार्यकर्ता असल्याचे या पुस्तकातून त्यांनी दाखवून दिले. अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या आहेत.
बलकवडे म्हणाले, पुणे शहराचे दुसरे सार्वजनिक काका शांतीलाल सुरतवाला यांची ओळख आहे. त्यांच्याकडे अनेक घटनांचा संग्रह आहे. गणेश मंडळाच्या मुशीत तयार झालेला कार्यकर्ता असून सर्व सामान्यांचे दुःख त्यांना माहित आहे. पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवात मोठा ठसा त्यांचा आहे. समाजकारणातून राजकारणात जाऊन त्यांनी समाजसेवा केली. कोणताही राजकीय वारसा नसताना राजकारणात यशस्वी होऊन त्यांनी दाखवले. अंतिम ध्येय राष्ट्र आणि समाजसेवा असली पाहिजे हे त्यांनी त्यांच्या कार्यातून दाखवून दिले आहे. तसेच समाजसेवेपासून ते उत्तर ध्रुवापर्यंत जाणारा पहिला महापौर अशी त्यांची ओळख आहे.
डॉ. कराड म्हणाले, अनुभवाचे कथन करणारे हे शांतीलाल सुरत वाला यांचे पुस्तक आहे. कार्यकर्ता, महापौर कसा असावा हे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवले आहे. तत्त्वज्ञानाचे चिंतन प्रत्यक्ष जीवनात त्यांनी उतरवले आहे. हे पुस्तक म्हणजे विचार मंथन करणारे असून पुढील पिढीला मार्गदर्शन करणारे आहे. यांनी आपल्या या पुस्तकातून सत्य बोलण्याचे धाडस दाखवले आहे. विनम्र भावनेने शांतीलाल सुरत वाला यांनी पस्ता पुस्तक रुपातून आपले अनुभव मांडले असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन लेखक माजी महापौर शांतीलाल सुरत वाला यांनी स्वतः केले यावेळी त्यांनी पुण्यातील विकासाविषयी, सार्वजनिक गणेश मंडळातील अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या. पुण्यातील महाराणा प्रताप उद्यान, पु ल देशपांडे उद्यान करण्यासाठी केलेला प्रयत्न केला. हा प्रयत्न तिने यशस्वी करून दाखवला हा किस्सा त्यांनी यावेळी सांगितला प्रत्येकाने आपले डॉक्युमेंटेशन ठेवावे या हेतूने मी हे पुस्तक लिहिले आहे महापौर असताना दोन झाडे लावण्याचा विक्रम मला करायचा होता तसेच पाटलांचा वाडा प्रकल्प हा आणायचा होता मात्र मुदत संपल्याने मला हे काम करता आले नाही पुण्याच्या आठवणी जपून ठेवल्या पाहिजे म्हणून हे पुस्तक मी लिहिले आहे शंतनुराव किर्लोस्कर, पु.ल.देशपांडे. रामशास्त्री आठवले असे अनेक लेखक मी जवळून पाहिले असून त्यांच्याशी गप्पा मारलेला आहे त्यांच्या आठवणी यात मी मांडल्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कोठाडिया पुस्तकाबद्दल विवेचन केले. कार्यक्रमाचे आभार जतीनभाई सुरतवाला यांनी मानले.

                                   

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments