Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedकेईएम हॉस्पिटल पुणे तर्फे डेव्हलपमेंटल अससेसमेंट स्केल्स फॉर इंडियन इनफंट्स कार्यशाळा संपन्न

केईएम हॉस्पिटल पुणे तर्फे डेव्हलपमेंटल अससेसमेंट स्केल्स फॉर इंडियन इनफंट्स कार्यशाळा संपन्न

पुणे, 11 जून २०२४: केईएम हॉस्पिटल पुणे तर्फे नुकतेच बेली स्केलचे भारतीय रूपांतर असलेल्या डेव्हलपमेंटल असेसमेंट स्केल्स फॉर इंडियन इनफंट्स (डीएएसआयआय) या विषयावर सहा दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. बौद्धिक, मानसिक विकासाचे मूल्यांकन करण्यासाठी ही योग्य मूल्यांकन पद्धती असून जन्मापासून ते 30 महिन्यांपर्यंतच्या कालावधीत केली जाते. ज्या मुलांची मानसिक – शारीरिक वाढ अपेक्षेप्रमाणे होत नाही त्यांसाठी ही मूल्यांकन पद्धती योग्य आहे.

ही बुद्ध्यांक मूल्यांकन पद्धती 1 महिना ते 30 महिने वयोगटातील बाळांच्या विकासात्मक वाढीबाबत माहिती देते. तसेच मानसिक व शारीरिक विकासाच्या विविध पैलूंचे मूल्यांकन करण्यातही मदत करते. यामुळे विकासात्मक समस्यांचे लवकर निदान होऊ शकते व लवकर उपचार सुरु केल्यामुळे विशेष करून बाल अतिदक्षता विभागातून घरी गेलेल्या व उच्च जोखीम असलेल्या नवजात बालकांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.

या कार्यशाळेत संपूर्ण भारतभरातील नवजात शिशु तज्ज्ञ,बालरोगतज्ञ, मानसशास्त्रज्ञ सहभागी झाले होते.

या कार्यशाळेत नवजात शिशु तज्ज्ञ,अनुवांशिक तज्ञ, ईएनटी तज्ञ आणि पीडियाट्रिक ऑर्थोपेडिक सर्जन यांसारख्या विविध तज्ञांची व्याख्याने आणि प्रात्यक्षिके यांचा समावेश होता. मानसशास्त्रज्ञ, ऑक्युपेशनल थेरपिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट यांनी या चाचणीबाबत प्रात्यक्षिकां द्वारे मार्गदर्शन केले.

केईएम हॉस्पिटल पुणे मधील वरिष्ठ बालरोग तज्ञ डॉ.सुधा चौधरी म्हणाल्या की, गेल्या 13 वर्षांपासून ही कार्यशाळा आयोजित करणारे केईएम हॉस्पिटल पुणे हे भारतातील एकमेव केंद्र आहे.

या कार्यशाळेमुळे सहभागींना आपल्या संबंधित केंद्रांमध्ये बालकांच्या विकासात्मक समस्यांचे लवकर निदान आणि लवकर उपचार करण्यास मदत होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments