मुंबई, 14 जून 2024: – अॅमेझॉन मिनी टीव्ही ही अॅमेझॉनची विनामूल्य व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा तुर्की, कोरियन आणि मँडरिन भाषेत कार्यक्रमांची एक बहुप्रतिक्षित श्रेणी जून महिन्यात सुरू करण्याची घोषणा करताना रोमांचित आहे. आकर्षक नाटके आणि रंजक कथांच्या वैविध्यपूर्ण मालिकेने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी तयार केलेले हे आंतरराष्ट्रीय कार्यक्रम मूळ भाषेत उपलब्ध आहेत. तसेच ‘मिनीटीव्ही इम्पोर्टेड’ अंतर्गत हिंदी, तामिळ आणि तेलगू भाषेत डब करण्यात आले आहेत. सौंदर्यात्मक आंतरराष्ट्रीय मांडणी, भावनिक कथा आणि अविस्मरणीय पात्रांसह, जागतिक स्तरावर कौतुकास पात्र ठरलेले हे कार्यक्रम प्रेक्षकांना त्यांच्या पसंतीच्या भाषेत, त्यांच्या घरी आरामात, विविध संस्कृतींच्या रोमांचक प्रवासावर घेऊन जातील. सर्वोच्च दर्जाच्या जागतिक मनोरंजनाची वैविध्यपूर्ण मालिका थेट तुमच्या पडद्यावर सादर होईल. या महिन्याच्या निवडक यादीमध्ये थँक यू डॉक्टर, हियर मी, माय डियरस्ट, नंबर्स आणि मिस लकी गो यासह चाहत्यांच्या आवडत्या शीर्षकांचा समावेश आहे.
जर तुम्ही गुंतवून ठेवणाऱ्या कथानकाचे चाहते असाल, उत्कंठावर्धक प्रेमकथा तुम्हाला आवडत असतील किंवा थरारक साहस थक्क करत असेल तर यंदा जून महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या कथा याच संकल्पना घेऊन येणार आहेत. थँक यू डॉक्टर या जीव वाचवण्यासाठी कटिबद्ध असलेल्या डॉक्टरांच्या तीव्र आव्हानांचा आणि पराक्रमी प्रयत्नांचा शोध घेणारे एक मर्मस्पर्शी वैद्यकीय नाटक, किंवा ‘हियर मी’ मधील लवचिक आणि आत्म-शोधाच्या खोलवरील कथा पहा. काही व्यक्ति अपंगत्व असूनही, स्वत:चा अद्वितीय आवाज शोधतात आणि जवळच्या अर्धांगवायू झालेल्या मित्राच्या अपघाताचा तपास करण्याचा प्रयत्न करतात. ‘माय डियरेस्ट “या प्रणय कथेत आक्रमणादरम्यान जोसॉनमधील एक थोर स्त्री आणि एक रहस्यमय पुरुष यांच्यातील प्रेमकथा पहा, आणि पैशाच्या संघर्षमय जगात घडणाऱ्या, जिथे धोरणात्मक निर्णयांमुळे मोठे यश किंवा विनाशकारी अपयश येऊ शकते, अशा कथानकावर आधारलेला थरारपट “नंबर्स” पहा. ‘मिस लकी गो” ही विनोदी प्रेमकथा अनुभवा. या कथेत एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे आयुष्य एका चुकीच्या मोठ्या बदलानंतर अनपेक्षित वळण घेते.
अॅमेझॉन मिनीटीव्ही’चे कंटेंट हेड अमोघ दुसाद म्हणाले, “अॅमेझॉन मिनीटीव्ही’मध्ये आम्ही देशांतर्गत भाषांमध्ये सर्वोच्च आंतरराष्ट्रीय आशय सादर करण्यासाठी समर्पित आहोत. जे देशभरातील प्रेक्षकांना उपलब्ध आहेत. नव्याने सुरू करण्यात आलेली जून महिन्यातील मालिका ही मूळ आणि हिंदी, तामिळ आणि तेलगू भाषेत डब केलेल्या विविध कथाप्रकारांवर आधारित जागतिक स्तरावरील कौतुकास पात्र कार्यक्रमांची निवड करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे. तीव्र भाव-भावनांचा खेळ असलेले वैद्यकीय नाट्य ते प्रेमकथा आणि धडकी भरवणाऱ्या थरारपटांपर्यंत, प्रेक्षकांना जगाच्या जवळ आणणारा एक अतुलनीय अनुभव उपलब्ध करून देण्याचे आमचे ध्येय आहे”.
हे आंतरराष्ट्रीय कार्यक्रम मूळ, हिंदी, तेलगू आणि तामिळ भाषेत, विशेषतः ‘अॅमेझॉन मिनीटीव्ही इम्पोर्टेड’ वर अॅमेझॉनच्या शॉपिंग अॅपमध्ये, प्राइम व्हिडिओ, फायर टीव्ही, स्मार्ट टीव्हीवर विनामूल्य स्ट्रीम होतील किंवा प्ले स्टोअरवरून अॅप डाउनलोड करता येतील.
XXX


