सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व ट्रान्सेंडेंटल टेक्नोलॉजीज तर्फे सायबर सुरक्षा अभ्यासक्रम सुरू
पुणे,18 जून 2024 : सायबर सुरक्षा आव्हानांचा सामना करण्यासाठी व डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी तरूणांना कौशल्य आणि तंत्रज्ञानाने प्रशिक्षित करणे गरजेचे आहे,असे मत तज्ञांनी व्यक्त केले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि ट्रान्सेंडेंटल टेक्नॉलॉजीज यांच्या तर्फे सायबर सुरक्षा विषयी अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहे. यानिमित्त पूना क्लब येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.पराग काळकर, एसपीपीयूच्या तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ.आदित्य अभ्यंकर, एसपीपीयूच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विलास आढाव, 2016 चे छत्रपती पुरस्कार विजेता डॉ.अरुण दातार, डॉ.आरती दातार, ट्रान्सेंडेंटल टेक्नॉलॉजीजचे भागीदार डॉ.बी.एम. सातपुते,ट्रान्सेंडेंटल टेक्नॉलॉजीजच्या कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक डॉ. लीना सातपुते, ट्रान्सेंडेंटल टेक्नॉलॉजीजचे संस्थापक आणि संचालक डॉ. केतन अत्रे, ट्रान्सेंडेंटल टेक्नॉलॉजीजच्या ग्लोबल एचआर आणि ऍडमिन प्राजक्ता गिरी आणि पूना कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष एराना गानला आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
सुरू केलेल्या अभ्यासक्रमांमध्ये सायबर सिक्युरिटी स्पेशलिस्ट (सीएसएस) – कालावधी -2 महिने, क्रेडिट्स – 18, मास्टरींग इन्फॉर्मेशन सिक्युरिटी (एमआयएस) – कालावधी 6 महिने, क्रेडिट्स – 20 , सायबर क्राइम इन्व्हेस्टिगेटर (सीसीआय) – कालावधी 6 महिने, क्रेडिट्स – 28 यांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू आहेत.
या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना, व्यावसायिकांना आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सायबर सुरक्षा संबंधी वाढत्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि त्यांच्या माहिती प्रणालीचे रक्षण करण्यासाठी आणि सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि ज्ञान मिळविण्यास मदत होणार आहे .ऑफेंसिंव्ह अँड डिफेन्सिव्ह सिक्युरिटी, एसओसी अँड एसआयईएम,सायबर इंटेलिजन्स अँड इन्व्हेस्टिगेशन, डार्क वेब, सायबर फॉरेन्सिक्स अँड इन्सिडेंट रिस्पॉन्स,क्लाउड सिक्युरिटी, नेटवर्क सिक्युरिटी अँड क्रिप्टोग्राफी आणि इतर विशेष कौशल्यांमध्ये या अभ्यासक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना कौशल्य प्राप्त करता येणार आहे.
हे अभ्यासक्रम डायरेक्ट ॲक्शन इंटरनॅशनल यूके आणि कॅनेडियन असोसिएशन फॉर सिक्युरिटी अँड इंटेलिजेंस स्टडीज, व्हँकुव्हर कॅनडा द्वारे मान्यताप्राप्त आहेत. पोलीस आणि कायदा अंमलबजावणी, सामाजिक आणि राजकीय क्षेत्र, सायबर सुरक्षा आणि कॉर्पोरेट एमएनसी, सशस्त्र दल, शैक्षणिक उद्योग, सायबर फॉरेन्सिक आणि इंटेलिजन्स या क्षेत्रातील अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर म्हणाले की, सायबर सिक्युरिटी अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना संस्थेच्या सायबर सुरक्षा रणनीतीत बदल घडवून आणण्यासाठी कौशल्याने सुसज्ज करतील. क्रिप्टोग्राफी, एपीआय सिक्युरिटी, एनक्रिप्शन, नेटवर्क सिक्युरिटी,मालवेअर अनालिसिस, पेनेट्रेशन टेस्टिंग करण्यासाठी विद्यार्थी व्यापक दृष्टिकोन शिकू शकतील .या क्षेत्रांमध्ये प्रभुत्व मिळवून, विद्यार्थी उद्योग-सज्ज सायबरसुरक्षा व्यावसायिक म्हणून उभे राहतील, आधुनिक सुरक्षा आव्हानांना सामोरे जाण्यास आणि माहिती प्रणालींचे रक्षण करण्यास सक्षम होतील.
एसपीपीयूच्या तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ.आदित्य अभ्यंकर म्हणाले की,विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेच्या मूलभूत आणि अद्ययावत स्तर दोन्ही शिकविले जातील. सुरवातीपासून, सायबर सुरक्षा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये आत्मसात करून विद्यार्थ्यांना रोजगारक्षमा बनण्यास मदत होईल.
ट्रान्सेंडेंटल टेक्नॉलॉजीजचे संस्थापक आणि संचालक डॉ. केतन अत्रे (सायबर आणि नॅशनल सिक्युरिटी आणि इंटेलिजन्स प्रोफेशनल – लंडन, यूके.) म्हणाले की, हे अभ्यासक्रम विद्यार्थी, व्यावसायिक आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सायबर सुरक्षा संबंधी वाढत्या समस्या दूर करण्यासाठी आणि त्यांच्या माहितीचे संरक्षण करण्यासाठी व सायबर गुन्ह्यांना अधिक कार्यक्षमतेने हाताळण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि ज्ञानाने सुसज्ज करतील. हा अभ्यासक्रम ट्रान्सेंडेंटल टेक्नॉलॉजीज इंडियाने व्हिजन फॉर द नेशन – सायबर सिक्युरिटी स्ट्रॅटेजी इंडिया या प्रमुख उपक्रमांतर्गत सुरु करण्यात केला आहे.


