Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedहेलियसने आपल्या आंतरराष्ट्रीय ब्रँड पोर्टफोलिओचा विस्तार केला; विशेष भागीदारी करून लक्झरी स्विस...

हेलियसने आपल्या आंतरराष्ट्रीय ब्रँड पोर्टफोलिओचा विस्तार केला; विशेष भागीदारी करून लक्झरी स्विस वॉचमेकर चॅरिओलला भारतात आणले

दिल्ली, १८ जून, २०२४: टायटन कंपनी लिमिटेडचा, भारतातील सर्वात मोठा प्रीमियम वॉच रिटेलर ब्रँड, हेलियसने एका विशेष भागीदारीमार्फत स्विस लक्झरी वॉचमेकर चॅरिओलला भारतात आणून आपल्या आंतरराष्ट्रीय ब्रँड पोर्टफोलिओचा विस्तार केला आहे. प्राचीन सेल्टिक कलेने प्रेरित निर्दोष कारीगरी आणि सघन वारसा यासाठी नावाजला जाणारा चॅरिओल ब्रँड हेलियसच्या ४० पेक्षा जास्त ग्लोबल ब्रँड्सच्या प्रतिष्ठित कलेक्शनमध्ये दाखल झाला आहे.

बाईन अँड कंपनीच्या एका अहवालानुसार, भारताची लक्झरी बाजारपेठ २०३० सालापर्यंत सध्या आहे त्यापेक्षा ३.५ पटींनी वृद्धिंगत झालेली असेल. शहरीकरण, इच्छा आणि चैनींवर खर्च करण्याजोग्या उत्पन्नामध्ये झालेली वाढ आणि मध्यम व उच्च-मध्यम वर्गाच्या लोकसंख्येत वेगाने होत असलेली वाढ यामुळे भारतात लक्झरी उत्पादनांची मागणी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे हेलियसच्या प्रीमियमायजेशनच्या घोडदौडीला चालना मिळाली आहे. जागतिक लक्झरी ब्रँड्सचा अतुलनीय पोर्टफोलिओ तयार करून ग्राहकांना जगभरातील सर्वात प्रतिष्ठित घड्याळे सहज उपलब्ध व्हावीत यासाठी हेलियस ब्रँड वचनबद्ध असून या धोरणात्मक निर्णयामुळे ती वचनबद्धता अधिकच मजबूत झाली आहे. हेलियसच्या वाटचालीतील हा एक महत्त्वाचा टप्पा असून त्यामुळे ब्रँडच्या प्रीमियम ऑफरिंग्समध्ये वाढ झाली आहे इतकेच नव्हे तर, उत्पन्नातील वाढीमुळे ज्यांचे सामाजिक स्थान उंचावत आहे अशा भारतीय ग्राहकांना प्रगत होरोलॉजिकल सोफिस्टिकेशन आणि कारीगरी प्रदान करण्यात देखील हे एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. २४० पेक्षा जास्त स्टोर्स असलेले हेलियस हे वेगाने वृद्धिंगत व प्रगत होत चाललेल्या भारतीय बाजारपेठेत प्रवेश करू इच्छिणाऱ्या आंतरराष्ट्रीय ब्रँड्ससाठी अतिशय महत्त्वाचा गेटवे ठरला आहे.

ब्रँडच्या लॉन्च प्रसंगी, टायटन कंपनी लिमिटेडच्या वॉचेस अँड वेयरेबल्स डिव्हिजनच्या सीईओ श्रीमती सुपर्णा मित्रा यांनी सांगितले, “अतिशय विचारपूर्वक निवडल्या जाणाऱ्या आमच्या कलेक्शनमध्ये चॅरिओलचा समावेश करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. प्रीमियम कॅटेगरीमधील आमच्या धोरणात्मक विस्तारामध्ये ही लक्षणीय प्रगती आहे असे आम्ही मानतो. आमच्या आंतरराष्ट्रीय पोर्टफोलिओचा सातत्याने विस्तार करून २०२४-२५ मध्ये ३५% वृद्धीचे उद्दिष्ट आम्ही आखले आहे. स्विस वारसा, कारीगरी आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा मिलाप असलेला चॅरिओल ब्रँड आमच्या चोखंदळ ग्राहकांच्या आवडीनिवडी पूर्ण करण्याच्या आमच्या मिशनला पुरेपूर अनुरूप आहे. या भागीदारीमुळे आमच्या पोर्टफोलिओमध्ये मोलाची भर पडली आहे, इतकेच नव्हे तर, संपूर्ण जगभरातील प्रीमियम घड्याळांच्या खरेदीसाठी पसंतीचे ठिकाण ही हेलियसची ओळख देखील मजबूत झाली आहे.”

चॅरिओलच्या सीईओ आणि क्रिएटिव्ह डायरेक्टर श्रीमती कोरली चॅरिओल यांनी यावेळी सांगितले, “प्रचंड क्षमता आणि उत्तम कारीगरीविषयी विशेष आवड असलेल्या भारतीय बाजारपेठेत चॅरिओल दाखल करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. भारतामध्ये संपन्नतेमध्ये होत असलेली वाढ व महत्त्वाकांक्षी खरेदीचे ट्रेंड्स या पार्श्वभूमीवर सिग्नेचर सेल्टिक केबल मोटिफ व स्विस कारीगरी दर्शवणारी आमची अनोखी, उच्च दर्जाची उत्पादने चोखंदळ भारतीय ग्राहकांसाठी अतिशय उत्कृष्ट आहेत. टायटन कंपनी लिमिटेडच्या हेलियससोबत धोरणात्मक भागीदारी आम्हाला आमच्या टार्गेट ग्राहकवर्गापर्यंत पोहोचून त्यांना अतुलनीय अनुभव प्रदान करण्यात मदत करेल. दीर्घकालीन वृद्धीसाठी आम्ही वचनबद्ध आहोत. भारतातील लक्झरी वातावरणाचा मौल्यवान भाग बनण्यासाठी उत्सुक आहोत.”

अधिकाधिक आंतरराष्ट्रीय लक्झरी ब्रँड्स भारतात आणण्याच्या धोरणात्मक प्रयत्नांची सुरुवात हेलियसने चॅरिओलला भारतात लॉन्च करून केली आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये अजून ४० नवीन स्टोर्स सुरु करण्याची त्यांची योजना आहे. प्रीमियम वॉच सेगमेंटमध्ये आपले स्थान अधिक बळकट करून भारतीय ग्राहकांच्या वाढत्या, बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी हेलियस बांधील आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments