Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedराज्य सरकारची अधिसूचना अलार्ड विद्यापीठ १९ जून पासून कार्यान्वित

राज्य सरकारची अधिसूचना अलार्ड विद्यापीठ १९ जून पासून कार्यान्वित

पुणे, २२ जूनः देशाच्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळण्यासाठी केंद्र व राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच अनुषंगाने पुणे येथे अलार्ड विद्यापीठ, स्थापनेस मंजूरी दिली होती. या संदर्भातील राज्य सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून व महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार शासनाचे उप सचिव अजित बाविस्कर यांनी अलार्ड विद्यापीठास १९ जून २०२४ पासून कार्यान्वित झाल्याचे निश्चित करीत आहोत असा उल्लेख असलेले एक पत्र नुकतेच या विद्यापीठास सोपविण्यात आले आहे.
या पत्रानुसार क्रमांक स्वअवि-२०२३ प्र.क्र.०२ विशि-४-महाराष्ट्र खाजगी विद्यापीठ (स्थापना व विनियम) अधिनियम, २०२३ ( २०२४ चा महा. ८) याच्या कलम ७ च्या पोट-कलम (३) याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर केला आहे. त्यानुसार महाराष्ट्र शासनाद्वारे हे निश्चित करण्यात आले आहे की पुणे येथील अलार्ड विद्यापीठ दि. १९ जून २०२४ पासून कार्यान्वित झाले आहे.
या संदर्भात अलार्ड विद्यापीठ, पुणेचे संस्थापक अध्यक्ष व कुलाधिपती डॉ. एल.आर.यादव यांनी राज्य आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे आभार मानले आहे. ‘हम अलग है, हम अलार्ड है’, यासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण उच्च दर्जाचे शिक्षण दिले जाईल. व्यावहारिक शिक्षण आणि वास्तविक जगाच्या अनुभवावर लक्ष केंद्रित करून उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी समर्पित आहे. येथे ७० टक्के व्यावहारिक अध्यापन आणि ३० टक्के सिद्धांताचा एक अद्वितीय दृष्टीकोन असेल. विद्यार्थ्यांना १०० टक्के गॅरंटीड इंटर्नशिपची खात्री देते. विद्यापीठ सर्वसमावेशक शैक्षणिक कार्यक्रम आणि अत्याधुनिक सुविधांद्वारे भविष्यातील नेते आणि नवकल्पनांना आकार देण्यासाठी वचनबद्ध असेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments