Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedमाणिकडोहच्या आयटीआयमधील (आदिवासी) विविध व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन*

माणिकडोहच्या आयटीआयमधील (आदिवासी) विविध व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन*

 

 

पुणे, दि. २४ : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी) माणिकडोह, जुन्नर येथे सत्र २०२४-२५ करीता विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ३० जूनपर्यंत https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

माणिकडोह येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ही सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर व पुणे या जिल्ह्याकरिता एकमेव आदिवासी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे. या संस्थेतून अनेक विद्यार्थी व्यवसायिक शिक्षण घेवून स्थावलंबी बनले असून रोजगार व स्वयंरोजगार करत आहेत. संस्थेमध्ये प्रात्यक्षिकाभिमुख प्रशिक्षणाच्या सर्व अद्ययावत सुविधा उपलब्ध आहेत. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी १० वी च्या निकालानंतर लगेचच प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

 

संस्थेत वेल्डर (जीटीअेडब्लू व जीएमअेडब्लू) प्रवेश क्षमता 40, मेकॅनिक डिझेल 48, कॅम्पुटर ऑपरेटर ॲन्ड प्रोग्रामिंग असिसस्टंट २४, वेल्डर, ड्रेस मेकिंग हे प्रत्येकी २० प्रवेश क्षमतेचे एक वर्षाचे अभ्यासक्रम तर वायरमन, टर्नर हे प्रत्येकी २० प्रवेश क्षमतेचे, पेंटर (जनरल), मशिनिष्ठ प्रत्येकी ४०, इनफॉरमेशन टेक्नॉलॉजी ॲन्ड इलेक्ट्रीक सिस्टीम मेंटनन्स, मेकॅनिक मोटार व्हेईकल, टुल ॲन्ड डायमेकर हे प्रत्येकी २४ प्रवेश क्षमतेचे दोन वर्षाचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

 

संस्थेत प्रवेशासाठी शाळा सोडल्याचा दाखल्याची मूळ प्रत, १० वीचे गुणपत्रक, आयकार्ड आकाराचे ४ छायाचित्र, आधारकार्डची छायांकित प्रत, दिव्यांग असल्यास जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रमाणपत्र, जातीचा दाखला, नॉन क्रीमिलेयर प्रमाणपत्र, एनसीसी, एमसीसी व स्काऊट असल्यास त्याचे प्रमाणपत्र, इंटरमिजिएट ड्रॉईंग असल्यास प्रमाणपत्र, जिल्हा व राज्यस्तरीय स्पोर्ट्स प्रमाणपत्र असल्यास, बँक खात्याच्या (प्राधान्य स्टेट बँक ऑफ इंडियाचा असावे) पास बुकाची छायांकित प्रत, विद्यावेतनासाठी अधिवास प्रमाणपत्र व तहसील कार्यालयाचा उत्पन्न दाखला आदी कागदपत्रांची आवश्यकता आहे. तसेच प्रवेश अर्ज भरताना नमूद केलेला पहिल्या क्रमांकाचा मोबाईल क्रमांक प्रशिक्षण पूर्ण होईपर्यंत सुरू असणे आवश्यक आहे.

 

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी संकेतस्थळावर भेट द्यावी. तसेच इच्छुक उमेदवारांनी जवळच्या नागरी सुविधा केंद्रातून ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन आयटीआय (आदिवासी), माणिकडोहचे प्राचार्य दत्ता जगताप यांनी केले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments