पुणे, २४ जुन २०२४: बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित व पुणे जिल्हा बुद्धीबळ सर्कल (पीडीसीसी)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या स्वर्गीय मंगला शंकर समुद्र मेमोरियल रॅपिड बुद्धीबळ स्पर्धेत खुल्या गटात समीर कठमळे याने,तर १५ वर्षाखालील गटात पुर्व चौहान याने अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले.
कर्वे रोड येथील अश्वमेध हॉल या ठिकाणी पार पडलेल्या या स्पर्धेत सातव्या फेरीत खुल्या गटात समीर कठमळेने सौरभ म्हामने चा पराभव करून ६.५गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. तर, यश जोशीने ६ गुणांसह दुसरा आणि श्रावणी उंडाळे (६गुण) हीने तिसरा क्रमांक पटकावला.
१५ वर्षाखालील गटात पुर्व चौहानने मार्मिक शहाचा पराभव करून ६.५गुणांसह विजेतेपदाला गवसणी घातली. क्षितिज प्रसाद(६.५गुण)याने दुसरा व ईशान अर्जुन पीवाय(६गुण) याने तिसरा क्रमांक पटकावला.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण इंटरनॅशनल मास्टर प्रथमेश मोकल, बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त प्रकाश कुंटे, पीडीसीसीचे खजिनदार चंद्रकांत मोकाशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चीफ आरबीटर विनिता क्षोत्री, एफए श्रद्धा विंचवेकर आदी मान्यवर उपस्थित होते. याशिवाय स्पर्धेप्रसंगी दहावी इयत्तेत 100टक्के गुण प्राप्त करणाऱ्या आदिती कयाळ आणि 88टक्के गुण मिळवणाऱ्या सिद्धी धाडवे, आयएम नॉर्म मिळवणाऱ्या अक्षय बोरगांवकर यांचा सत्कार करण्यात आला.
निकाल: सातवी फेरी: व्हाईट व ब्लॅक यानुसार:
खुला गट:
सौरभ म्हामने(५.५गुण)पराभुत वि.समीर कठमळे(६.५गुण);
श्रावणी उंडाळे (६गुण) वि.वि.आदिती कयाळ (५.५गुण);
यश जोशी(६गुण) वि.वि.आर्यन शहा(५गुण);
अविरत चौहान (५.५गुण) वि.वि.सिद्धांत ताम्हणकर (५गुण);
ओम लामकाने(५.५गुण) वि.वि.हितांश जैन(४.५गुण);
यश वातारकर (५.५गुण) वि.वि.अलौकिक सिन्हा(४.५गुण);
अनुष्का कुतवळ (५गुण)बरोबरी वि. आर्यन सिंगला(५गुण);
कल्पेश देवांग (५.५गुण) वि.वि.आदित्य जोशी(४.५गुण);
प्रणव बुरली(४.५गुण)बरोबरी वि.अमेय चौधरी(५गुण);
अनिकेत भुनिया (५गुण) वि.वि.सेरा डगारिया(४गुण);
१५ वर्षाखालील गट:
मार्मिक शहा (५.५गुण)पराभुत वि. पुर्व चौहान (६.५गुण);
क्षितिज प्रसाद (६.५गुण) वि.वि.वरद गायकवाड(५गुण);
लाथिक राम(५.५गुण)बरोबरी वि. शुभम घनवट(५.५गुण);
ईशान अर्जुन पीवाय(६गुण) वि.वि.प्रतिती खंडेलवाल(५गुण);
राकेश मथियाझगन (४.५गुण)पराभुत वि. अन्वय झेंडे (५.५गुण);
आयुश कुलकर्णी(४.५गुण)पराभुत वि.अर्णव तापकीर(५.५गुण);
नैतिक माने(५गुण) बरोबरी वि. राघव पावडे (५गुण);
आदित्य तेलंगी (५गुण)बरोबरी वि. रिजुल कुऱ्हाडे(५गुण);
केविन मथियाझगन(५.५गुण)वि.वि.वेदांत कुबडे(४.५गुण);
लक्ष सरडा(४गु
ण) पराभुत वि. झिद निओ(५गुण).


