Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारताचे प्रतिनिधित्व करत अलाइव्ह चे संस्थापक रिषी तांदुळवाडकर यांनी ब्राझीलमधील G20 परिषदेत...

भारताचे प्रतिनिधित्व करत अलाइव्ह चे संस्थापक रिषी तांदुळवाडकर यांनी ब्राझीलमधील G20 परिषदेत जिंकले जागतिक स्तरावरील सर्वोत्कृष्ट उद्योजक पिच पारितोषिक

रिषी तांदुळवाडकर यांच्या नेतृत्वाखाली, अलाइव्ह- रिजनरेटिव्ह वेलनेस वैद्यकीय पथकाने 45 वर्षीय महिलेला जगातील आणि भारतातील पहिले स्टेम सेल बाळ जन्माला दिले

 

· महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्याकडून विशेष शिफारस पत्र प्रदान

 

 

 

पुणे, 25 जून, 2024: अलाइव्ह- रिजनरेटिव्ह वेलनेस या आरोग्यसेवा क्षेत्रातील स्टार्टअपचे संस्थापक, रिषी तांदुळवाडकर यांनी ब्राझीलमधील G20 यंग आंत्रेप्रिन्युअर्स अलायन्स समिट २०२४ (G20YEA) मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. या परिषदेत त्यांना सर्वोत्कृष्ट उद्योजक पिच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आरोग्यसेवेबाबत असलेला अलाइव्ह चा नावीन्यपूर्ण दृष्टीकोन आणि पुनरुत्पादक निरोगीपणासाठीची वचनबद्धता याची दखल घेऊन त्यांना या जागतिक स्तरावरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनीही आरोग्य सेवा क्षेत्रातील अलाइव्ह चे योगदान आणि जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या आजारांवरील उपाचाराबाबत सुरू असलेले त्यांचे काम याची दखल घेऊन विशेष शिफारस पत्र प्रदान केले आहे.

 

 

 

जागतिक स्तरावर देशातील नाविन्यपूर्ण उद्योजकतेची दखल घेतली गेल्याची पावती असणारा हा पुरस्कार भारतासाठी एक महत्त्वपूर्ण विजय आहे. या G20 देशामधील युवा उद्योजकांच्या शिखर परिषदेने हजारो तरुण उद्योजकांना एकत्र आणले. या परिषदेने अनेक नावीन्यपूर्ण कल्पनांचे आदानप्रदान करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना देण्यासाठी आणि उद्योजकीय उत्कृष्टता सादर करण्यासाठी युवा उद्योजकांना एक व्यासपीठ प्रदान केले.

 

 

 

या पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना रिषी तांदुळवाडकर म्हणाले, “हा पुरस्कार आणि प्रतिष्ठित G20 यंग आंत्रेप्रिन्युअर्स अलायन्स समिट (G20YEA ) शिखर परिषदेत आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी या दोन्ही गोष्टी खूप अभिमानाची बाब आहे. हा सन्मान, ही ओळख केवळ वैयक्तिक कामगिरीमुळे नाही, तर अलाइव्ह च्या संपूर्ण टीमच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाचा दाखला आहे. २०१९पासून G20 साठी भारतीय शिष्टमंडळाचा प्रतिनिधी म्हणून सहभागी होण्याची संधी मिळत आहे. आमच्या कामाची मिळालेली ही पोचपावती मला आरोग्यसेवेतील नवीन शक्यतांचा शोध घेण्यास प्रेरित करते. शाश्वत, रुग्ण-केंद्रित उपायांमध्ये, आरोग्यसेवेच्या प्रतिमानांमध्ये बदल घडवून आणण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करण्यास प्रेरणा मिळते. भविष्यात वृद्धत्वाला जीवनाचा एक सुंदर प्रवास म्हणून स्वीकारले जावे या उद्देशाने आम्ही कार्यरत आहोत. ”

 

 

 

या वर्षी, या परिषदेत जगभरातील ५०० प्रतिनिधी एकत्र आले होते. या परिषदेने या तरुण उद्योजकांना संवाद आणि विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी दिली. सौदी अरेबियाचे प्रिन्स फहाद एम अलसौद यांच्यासह प्रमुख नेते; दक्षिण आफ्रिकेचे ब्राझीलमधील राजदूत, एच.ई. वुसी माविम्बेला, AIJEC अध्यक्ष; रुबेन सॅन्स सोलसोना, फ्युचरप्रनर्स कॅनडातील प्रोमो सदस्य; तसेच एक लाखापेक्षा जास्त सदस्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तरुण उद्योजकांच्या युरोपियन कॉन्फेडरेशनचाही या शिखर परिषदेत सहभाग होता.

 

 

 

रिषी यांच्या नेतृत्वाखाली, अलाइव्ह च्या वैद्यकीय पथकाने वैविध्यपूर्ण उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यामध्ये ४५ वर्षे वयाच्या महिलेने जगातील पहिल्या स्टेम सेल बाळाला जन्म देण्यासह पुढील ४० स्टेम सेल बाळांच्या जन्माचा समावेश आहे. याव्यतिरिक्त,स्ट्रोकमुळे एका बाजूला अर्धांगवायू झालेल्या एका मुलाला ऑटोलॉगस सेल फ्रॅक्शन (ACF) थेरपीद्वारे नवजीवन देण्यातही यश मिळवले आहे. त्यांच्या नावीन्यपूर्ण उपचारांमुळे पार्किन्सन्सच्या रुग्णांमध्येही लक्षणीय सुधारणा दिसून आली असून, कंप कमी होण्यासह हालचालींवरील नियंत्रणकौशल्य वाढवण्यात यश आले आहे. ही उदाहरणे आणि इतर अनेक रुग्णावरील यशस्वी उपचार अलाइव्ह लोकांना आयुष्य केवळ जगण्यासाठी नाही, तर ते आरोग्यदायी आणि भरभरून जगण्याची संधी देण्यासाठी आरोग्यसेवेतील उत्कृष्ट मानके प्रस्थापित करण्यासाठी वचनबद्ध आहे, हे ठळकपणे दर्शवितात.

 

 

 

अलाइव्ह नैसर्गिक उपचार प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करून अत्याधुनिक उपचारतंत्रज्ञानाचा वापर करून पुनरुत्पादक निरोगी आयुष्यासाठी उपयुक्त आरोग्यसेवेचे नेतृत्व करत आहे. त्यांना मिळालेला हा जागतिक स्तरावरील पुरस्कार आरोग्यसेवा उद्योगातील या स्टार्टअपचे अव्वल स्थान अधोरेखित करतो आणि जागतिक स्तरावर भारतीय उद्योजकतेतील क्षमतेवर प्रकाश टाकतो. रिषी तांदुळवाडकर यांची समर्पित वृत्ती आणि अग्रगण्य दृष्टीकोन याचा आरोग्यसेवेच्या विविध पैलूवर आणि गतिशीलतेवर लक्षणीय परिणाम झाला आहे. नाविन्यपूर्ण उपचार पद्धतींद्वारे रुग्णांचे जीवन सुधारण्यात मोठी मदत होत आहे.

 

 

 

अलाइव्ह – रीजनरेटिव्ह वेलनेस:

 

अलाइव्ह – रीजनरेटिव्ह वेलनेस हा नावीन्यपूर्ण आरोग्यसेवा क्षेत्रामधील एक दीपस्तंभ आहे. रिषी तांदुळवाडकर, डॉ. सुनीता तांदुळवाडकर आणि डॉ. राजेश तांदुळवाडकर यांनी २०१६ मध्ये संशोधन सुरू केले आणि २०२३ मध्ये खुल्या बाजारात उपचार उपलब्ध करून दिले. अलाइव्ह हे आरोग्यसेवा क्षेत्रातील क्रांतीचे प्रणेते असून, पुनरुत्पादक औषधे आणि वैयक्तिकृत निरोगी उपायांसह वृद्धत्व स्वीकारण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल करत आहे. अलाइव्ह , ऑटोलॉगस सेल फ्रॅक्शन थेरपी आणि वैयक्तिकृत आयव्ही ड्रिप फॉर्म्युलेशनमध्ये निष्णात आहे. जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त घटकांचा वापर करून पुनरुत्पादक आणि उत्साहवर्धक आरोग्य प्रदान करण्यासाठी नावीन्यपूर्ण वैज्ञानिक संशोधनासाठी कार्यरत आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments