पुणे, दि. २५: तळेगाव दाभाडे आणि खडकवासला येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह येथे २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली असून इच्छुकांकडून प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
या दोन्हीही वसतिगृहात बाहेरगावाकडील परंतु मावळ तालुक्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थींनींना विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थींनींनी व पालकांनी मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, तळेगाव दाभाडे व खडकवासला येथे संपर्क साधून प्रवेश घ्यावा, असे आवाहन वसतिगृहाच्या गृहपालांनी केले आहे.
0000


