Thursday, October 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedअंमलीपदार्थ विरोधी मोहिमेत सहभाग घेत तरुणाईने केली जनजागृती आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र,...

अंमलीपदार्थ विरोधी मोहिमेत सहभाग घेत तरुणाईने केली जनजागृती आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र, आपलं फाऊंडेशन च्या वतीने आयोजन : आमदार सिध्दार्थ शिरोळे यांचा सहभाग

पुणे : अंमली पदार्थांच्या विळख्यात तरुणाई मोठया प्रमाणात अडकत असल्याच्या अनेक घटना पुण्यामध्ये वारंवार समोर येत आहेत. याचा प्रसार रोखला नाही, तर संपूर्ण तरुण पिढी उध्वस्त होईल, त्यामुळे अंमली पदार्थाचे सेवन करु नका… अंमली पदार्थापासून दूर रहा… असा संदेश देणारे फलक हातात घेऊन तरुणाईने अंमलीपदार्थ विरोधी मोहिमेत सहभाग घेत जनजागृती केली. यावेळी त्यांनी से नो ड्रग्सचा संदेशही दिला.

 

आनंदवन व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र, आपलं फाऊंडेशनच्यावतीने जागतिक अंमलीपदार्थ सेवन व अवैध वाहतूक विरोधी दिनानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर करण्यात आले. यावेळी आमदार सिध्दार्थ शिरोळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष डॉ. अजय दुधाणे, दत्तात्रय सोनार, विशाल शिंदे, ऋषिकेश इंगळे, संतोष पटवर्धन, सागर कांबळे तसेच आपलं फाउंडेशनचे मनिष भोसले, पवन जैनक, अंकित नाका, अथर्व नाईक, रजत श्रीवास्तव, गुरुप्रसाद रंधे, दैविक भालेराव, कार्तिक घाटगे आदी उपस्थित होते.

 

सिध्दार्थ शिरोळे म्हणाले, आज दारुपेक्षा भयंकर व्यसनाच्या विळख्यात तरुणाई अडकत आहे. व्यसन लागणाºया गोष्टींची हल्ली सहज उपलब्धता होते, त्यामुळे त्याचा वापर सर्रास होत असल्यामुळे व्यसनाधीनतेचे प्रमाण वेगाने वाढत आहे. पुण्यात अंमली पदार्थांचे व्यसन हा आकर्षणाचा विषय आहे. ते आकर्षण कमी करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी प्रत्येक अभियानात आपण सहभागी होऊया, असेही त्यांनी सांगितले.

 

डॉ. अजय दुधाणे म्हणाले, पुण्यामध्ये अंमली पदार्थ सेवनाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. गेल्या काही वर्षात अमली पदार्थ व्यसनांची दाहकता इतकी वाढली की, समउपदेशनाची सुरूवातही १४ ते १५ वयोगटातील मुलांपासून सुरू झाली आहे. त्याचबरोबर व्यसन करण्याचे विविध प्रकार देखील समोर येत आहेत. पुण्यातील तरुणाईमध्ये व्यसनांचे प्रमाण वाढत आहेच, त्याचबरोबर तरुणींमध्ये प्रमाण देखील वाढत आहे. तरुणाईला व्यसनाधीन होण्यापासून रोखण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments