Thursday, October 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedग्लोबल स्कूलचा अथर्वसिंग भदोरीयाची नेमबाजी स्पर्धेत निवड

ग्लोबल स्कूलचा अथर्वसिंग भदोरीयाची नेमबाजी स्पर्धेत निवड

कृपया प्रसिद्धीसाठी                                                            दि. २७ जून  २०२४

 

पुणे, २७ जून : 22 व्या कुमार सुरेंद्र सिंग नेमबाजी स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलचा विद्यार्थी अथर्वसिंग भदोरिया याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून भारतीय संघ निवड चाचणीसाठी पात्र ठरला आहे.  भारतीय संघाची निवड चाचणी जुलै महिन्यात दिल्लीत होणार आहे.  अथर्वसिंग भदोरियाने भारतीय संघात पात्रतेसाठी 555/600 गुण मिळवले आहेत.

 22 वी कुमार सुरेंद्र सिंग नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धा नुकतीच मध्य प्रदेश येथील भोपाळ मध्ये संपन्न झाली.  एअर पिस्तूल पुरुष गटात देशभरातून २ हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला.  यामध्ये नेमबाज अथर्वसिंगने दमदार सुरुवात करत 555 गुण मिळवले.  या भारतीय संघाच्या निवड चाचणीत ध्रुव ग्लोबल स्कूलचे दोन विद्यार्थी सहभागी होणार आहेत.  या यशाबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यशवर्धन मालपाणी व मुख्याध्यापिका संगीता राऊतजी यांनी त्यांचे अभिनंदन केले.  अश्विनी गुंजाळ, सोनाली परेराव आणि संध्या फरताडे या शिक्षिका त्यांना खेळाचे प्रशिक्षण देत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments