पुणे, दि. २७ : पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून जुलै महिन्यात पक्क्या अनुज्ञप्तीसाठी शिबीर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे. पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत खेड येथे १ व २ जुलै, मंचर येथे ८ व ९ जुलै, जुन्नर येथे १५ व १६ जुलै, वडगाव मावळ येथे २२ व २३ जुलै तर लोणावळा येथे २९ व ३० जुलै या दिवशी पक्की अनुज्ञप्ती शिबीर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पक्क्या अनुज्ञप्तीचा कोटा २८ जून रोजी सायंकाळी ५ वाजता उपलब्ध होणार असल्याचेही प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.


