पुणे,२८ जून २०२४ : नोबल हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटर ने रोटरी क्लब ऑफ पुणे सिनर्जी यांच्या सहयोगाने ह्युमन मिल्क बँक सुरू केली आहे. याचे उद्घाटन प्रसिध्द अभिनेत्री व निर्माता श्वेता शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 च्या प्रांतपाल रोटेरियन मंजू फडके, गव्हर्नर इलेक्ट रोटेरियन शीतल शहा, रोटरी क्लब ऑफ पुणे सिनर्जीच्या अध्यक्ष सोनम ठाकूर,नोबल हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.दिलीप माने,संचालक डॉ.दिविज माने, कार्यकारी संचालक डॉ.एचके साळे,पेडियाट्रिक्स विभागाचे प्रमुख डॉ.पी.डी.पोटे,नवजात शिशु तज्ञ व एनआयसीयूमधील ॲकेडेमिक्स विभागाचे प्रमुख डॉ.अनिल खामकर,ऑप्थॉल्मोलॉजी विभागाचे संचालक डॉ.मंगेश लिंगायत आणि निओनॅटोलॉजी विभागाचे संचालक डॉ.अभय महिंद्रे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.नोबल हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटर येथे ह्युमन मिल्क बँक सुरु करण्यामध्ये रोटेरियन डॉ.अर्चना शिंगवी आणि रोटेरियन नीरज पांचाळ यांनी महत्वाची भूमिका बजावली.
आईचे दूध हे बाळाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. बाळाच्या पोषक गरजांची पूर्तता करण्याबरोबरच मेंदू विकास,बालपणातील सामान्य आजार व मधुमेहासारख्या प्रौढत्वातील संभाव्य आजारांपासून रक्षण करते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार बाळाची पहिली दोन वर्षे अत्यंत महत्त्वाची असतात,कारण या काळात योग्य पोषण संभाव्य विकृती आणि मृत्यूदर कमी करते आणि दीर्घकालीन आजाराची जोखीम कमी करत सर्वांगीण विकासासाठी मदत होते.
ह्युमन मिल्क बँकच्या उद्घाटन प्रसंगी अभिनेत्री श्वेता शिंदे म्हणाल्या की, नोबल हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटरमध्ये ह्युमन मिल्क बँकची सेवा उपलब्ध झाल्याने अनेक माता व बाळांना याचा लाभ घेता येईल. ह्या उपक्रमाचे उद्घाटन करताना मला एक माता म्हणून खूप आनंद होत आहे.
नोबल हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटरच्या निओनॅटोलॉजी विभागाचे संचालक व नवजात शिशुतज्ञ डॉ.अभय महिंद्रे म्हणाले की,ह्युमन मिल्क बँक ही मुदतपूर्व जन्मलेल्या किंवा नवजात अतिदक्षता विभागात चिकित्सेची गरज असलेल्या बाळांसाठी वरदान ठरणार आहे.आईचे दूध हे लहान बाळांसाठी कल्याणकारी ठरते.नवीन अद्ययावत ह्युमन मिल्क बँक पुण्याच्या पूर्व भागातील गरजा पूर्ण करेल.या ह्युमन मिल्क बँकमध्ये मातांकडून दान केलेले दूध गोळा केल्यानंतर तपासणी केली जाईल. त्यानंतर पाश्चराईज्ड करून डीप फ्रीजरमध्ये ठेवले जाईल .
या ह्युमन मिल्क बँकला प्रख्यात लॅक्टेशन तज्ञ डॉ.संगीता खराटे यांचा भक्कम पाठिंबा आहे.
डॉ.महिंद्रे पुढे म्हणाले की,आईचे दूध हे बाळासाठी अत्यंत महत्त्वाचे असते.त्यासाठी फॉर्म्युला फीड हा पर्याय नाही.मुदतपूर्व जन्मलेल्या बाळांव्यतिरिक्त स्तनपानाशी निगडीत समस्या असलेल्या मातांच्या बाळांसाठी किंवा दुभंगलेल्या ओठासारख्या समस्या असलेल्या बाळांसाठी देखील महत्त्वाचे ठरणार आहे.मातांमध्ये जेव्हा स्तनपानाच्या समस्या निर्माण होतात किंवा पुरेसे दूध निर्माण होत नाही अशा वेळेस ब्रेस्ट फिडिंग तंत्राविषयी सल्ला दिला जातो व औषधोपचार केले जातात.त्यानंतर देखील ही समस्या दूर झाली नाही तर ह्युमन मिल्क बँक याचा बाळांना मोठा फायदा होतो.
नोबल हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.दिलीप माने म्हणाले की, ह्युमन मिल्क बँक हे रूग्णांसाठी कल्याणकारी चिकित्सा व सेवांचा सातत्याने विस्तार करण्याच्या आमच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. नोबल हॉस्पिटल मधील ह्यूमन मिल्क बँक हे पुण्यातील सातवे असून, पूर्व पुण्यातील पहिले आहे.त्यामूळे ह्या परिसरातील नागरिकांना याचा फायदा होईल.
रोटरी डिस्ट्रिक्ट 3131च्या प्रांतपाल रोटेरियन मंजू फडके यांनी रोटरी क्लबच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबद्दल माहिती दिली.
नवजात शिशु तज्ञ व एनआयसीयूमधील ॲकेडेमिक्स विभागाचे प्रमुख डॉ.अनिल खामकर यांनी आभा
र व्यक्त केले.


