Thursday, October 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedभूकरमापक तथा लिपीक-टंकलेखक संवर्गाची सुधारित प्रतिक्षा यादी प्रसिद्ध*

भूकरमापक तथा लिपीक-टंकलेखक संवर्गाची सुधारित प्रतिक्षा यादी प्रसिद्ध*

 

 

 

 

पुणे, दि.२८:- भूमि अभिलेख विभागाच्या भूकरमापक तथा लिपीक-टंकलेखक संवर्गातील सरळ सेवेची रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन परिक्षा निकालाच्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीआधारे पात्र ठरविलेल्या उमेदवारांमधून प्रादेशिक निवड समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय सुधारित प्रतिक्षायादी विभागातील भूमि अभिलेख कार्यालयांच्या

नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

 

 

प्रादेशिक निवड समितीने कागदपत्रे पडताळणीमध्ये पात्र ठरविलेल्या उमेदवारांमधून विभागातील उपलब्ध सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन तसेच यापूर्वी २८ एप्रिल,२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या निवड सूचि व प्रतिक्षायादीतील नेमणूक दिलेले व निवड रद्द करण्यासाठी विनंती केलेल्या उमेदवारांना प्रतिक्षायादीतून वगळण्यात आले आहे. विभागातील सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेवून तसेच माजी सैनिक आरक्षित रिक्त जागा त्या त्या प्रवर्गातील सर्वसाधारण उमेदवारांमधून रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने सदरहू प्रतिक्षा यादी उपसंचालक भूमि अभिलेख, पुणे प्रदेश पुणे व जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर या कार्यालयात प्रसिध्द करण्यात आली असल्याचे भूमि अभिलेख उपसंचालक अनिल माने यांनी कळविले आहे.

 

०००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments