Tuesday, September 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedडीएनईजी समूहाच्या दृश्य मनोरंजन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील नवसंकल्पनांना व सर्जनशील नेतृत्वाला गती देण्यासाठी...

डीएनईजी समूहाच्या दृश्य मनोरंजन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील नवसंकल्पनांना व सर्जनशील नेतृत्वाला गती देण्यासाठी $२०० मिलियनच्या भांडवलाचे पाठबळ

मुंबई – २ जुलै २०२४ – लंडन येथे मुख्यालय असलेली व दृश्य मनोरंजन तंत्रज्ञान आणि सेवांच्या क्षेत्रातील जागतिक स्तरावरील अग्रगण्य कंपनी डीएनईजी (“द ग्रुप”) ने आज युनायटेड अल साकेर ग्रुप (“यूएएसजी)” आपल्या समूहामध्ये $२ बिलियन अतिरिक्त उद्योगमूल्यानुसार $२०० मिलियनची धोरणात्मक गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली.

 

डीएनईजी समूहाकडे व्हिज्युअल इफेक्ट्स (व्हीएफएक्स) विभागामध्ये आघाडीचे स्थान भूषविण्यास साजेसा असा कल्पकतेचा २५ वर्षांचा सातत्यपूर्ण पूर्वानुभव व भक्कम नफेशीर वाढीचा इतिहास आहे. मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातील इतर सर्व भागांप्रमाणेच डीएनईजी समूह ज्या बाजारपेठेमध्ये कार्यरत आहे ती बाजारपेठही वेगवान बदलांना सामोरी जात आहे. यूएएसजी ने केलेल्या गुंतवणुकीमुळे केवळ व्हिज्युअल इफेक्ट्स पुरविणारी कंपनी ते सर्व प्रकारच्या कन्टेन्टची निर्मिती करणारी कंपनी इथपर्यंतची प्रगती साधण्यासाठी अभिनव संकल्पना राबविण्याच्या आणि वैविध्यपूर्णता जपण्याच्या डीएनईजी समूहाच्या धोरणाला गती मिळेल व त्यातून तंत्रज्ञान आणि सर्जनशील नेतृत्वातील सातत्याची हमी मिळेल. विशेषत:

 

§ डीएनईजी समूह ब्रह्मा या आपल्या तंत्रज्ञान शाखेला संपूर्णपणे सक्रिय करेल, जिथे उद्योगक्षेत्रातील सर्वात व्यापक एआय सुसज्ज, फोटो-रिअल सीजीआय क्रिएटर विकसित केले जात आहे, ज्यामध्ये डीएनईजी ने अलीकडेच युनिटीकडून ज्याचा विशेष परवाना मिळविला आहे त्या झिवा चाही समावेश आहे. ब्रह्मामुळे अॅप्लिकेशन्सच्या विस्तृत श्रेणीमधून फोटो-रिअल कन्टेन्ट निर्मितीचे लोकशाहीकरण होईल आणि असाधारण दर्जाच्या उत्पादनांची निर्मिती करण्यासाठी या उद्योगक्षेत्रात अग्रस्थानी राहण्यातून मिळविलेल्या २५ वर्षांच्या अनुभवाच्या पायावर ही इमारत उभी केली जाईल.

 

§ डीएनईजी समूहाची बौद्धिक संपदा आणि कन्टेन्ट निर्मिती शाखा प्राइम फोकस स्टुडिओजला त्यांची अलीकडची यशस्वी सहनिर्मिती द गारफील्ड मूव्हीच्या पाठोपाठ उच्च दर्जाच्या कन्टेन्टेमधील गुंतवणुकीचा आणि अशा कन्टेन्टच्या निर्मितीचा विस्तार करणे शक्य होईल.

 

§ डीएनईजी समूह आपले नवे कार्यालय आणि व्हिज्युअल एक्स्पीरियन्स केंद्र अबु धाबी येथे उघडेल, व त्यानंतर कन्टेन्ट निर्मिती, साठवणूक आणि वितरणासाठी मध्य पूर्वेमध्ये एक जागतिक दर्जाची परिसंस्था विकसित करण्याची कंपनीची योजना असेल. यामुळे मीडिया आणि तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये उच्च कौशल्याची आवश्यकता असलेल्या नोकऱ्यांच्या निर्मितीला पाठबळ मिळेल व त्यातून सर्जनशीलतेचे शक्तिस्थान म्हणून या प्रांताचे स्थान अधिकच बळकट होईल.

 

डीएनईजी चे चेअरमन आणि सीईओ नमित मल्होत्रा आपल्या विद्यमान पदावर कायम राहतील व समूहाच्या संचालक मंडळावर यूएएसजी मधील नबिल कोबेईसी आणि एदुआर्द झर्ड तसेच डीएनईजी समूहाची एक प्रमुख गुंतवणूकदार कंपनी असलेल्या NaMa कॅपिटलचे प्रभू नरसिंहन त्यांची साथ देतील जे ब्रह्माचे एक्झेक्युटिव्ह चेअरमन बनतील ब्रह्माचा शुभारंभ आणि विस्तार यावर देखरेख ठेवण्यासाठी प्रभू नरसिंहन NaMa कॅपिटलमधून गैरहजेरीची रजा घेतील.

 

डीएनईजी समूहातील घटक:

 

● डीएनईजी हॉलिवूडच्या आणि जगभरातील व्हिज्युअल एंटरटेनमेन्ट क्रिएटर्सना ऍकेडेमी अवॉर्ड् विजेते व्हिज्युअल इफेक्ट्स, अॅनिमेशन आणि संबंधित सर्जनात्मक सेवा देत राहील. डीएनईजी आपले काम तसेच ड्यून, ओपनहायमर, इंटरस्टेलर, टेनेट आणि ब्लेड रनर २०४९, तसेच हॅरी पॉटर, जेम्स बॉण्ड, फास्ट अँड फ्युरियस, मिशन:इम्पॉसिबल आणि मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स फ्रेंचाइजीससारख्या अनेक उच्चतम दर्जाच्या चित्रपट व अॅनिमेशनपटांतील कामगिरीसाठी ओळखले जाते.

 

● संपूर्णपणे सक्रिय करण्यात येणारे ब्रह्मा उद्योगक्षेत्रातील अव्वल दर्जाच्या एआय – सुसज्ज, फोटो-रियल सीजीआय क्रिएटरचा पुरवठा करेल.

 

● प्राइम फोकस स्टुडिओज लाइव्ह-अॅक्शन, अॅनिमेशन आणि गेमिंगसारख्या विविध स्तरांवर आपल्या कन्टेन्टमध्ये आणि आयपी गुंतवणूक व विकासामध्ये वाढ करेल. प्राइम फोकस हे सध्या अॅनिमल फ्रेंड्स, भारतीय महाकाव्य रामायण आणि अँग्री बर्ड्स मूव्ही ३ यांसारख्या अत्यंत नावाजलेल्या फीचर फिल्म्सची सह-निर्मिती करत आहे.

 

● प्राइम फोकस टेक्नोलॉजीज ही क्लाउड आधारित सॉफ्टवेअर व आर्टिफिशिय इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानात आघाडीवर आहे, ज्यात क्लिअर एआय कन्टेन्ट निर्मिती, कन्टेन्ट व्यवस्थापन आणि कन्टेन्ट मार्केटिंग व वितरण संचाचा समावेश आहे.

 

अबु धाबी डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचे चेअरमन हिज एक्सलन्सी अहमद जासिम अल झाबी म्हणाले, “युनायटेड अल साकेर समूहाने डीएनईजी समूहामध्ये केलेली धोरणात्मक गुंतवणूक म्हणजे सर्जनशीलता, नवसंकल्पना, तंत्रज्ञान आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रामध्ये वैश्विक ताकद म्हणून अबु धाबीच्या उदयाचे द्योतक आहे. ही भागीदारी केवळ मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातील तांत्रिक प्रगतीला गती देणारी नसून त्यातून कन्टेन्ट निर्मितीसाठी एका भरभक्कम परिसंस्थेची जोपासना करण्याप्रती आमची बांधिलकीही अधोरेखित होत आहे. अबु धाबीमध्ये एक नवीन व्हिज्युअल एक्स्पीरियन्स हब स्थापन करून आम्ही रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण करत आहोत व उच्च तंत्रज्ञानाने सुसज्ज उद्योगक्षेत्र आणि सर्वोत्कृष्ट निर्मितीला पाठबळ पुरविणाऱ्या आमच्या परिसंस्थेमध्येही त्यामुळे सुधारणा घडून येत आहे. आम्ही उचललेल्या या पावलामुळे नव्या क्षेत्रांतील गुंतवणुकी, दूरदर्शी उद्यमशीलता आणि जिथे सर्जनशीलता व तंत्रज्ञान यांचा संगम होतो अशा भरभराटीस पूरक वातावरणासाठीचे प्रमुख गंतव्यस्थान म्हणून अबु धाबीची प्रतिष्ठा पुन:स्थापित झाली आहे.”

 

यूएएसजी चे सीईओ नबिल कोबेईसी म्हणाले, “नमित, प्रभू आणि डीएनईजी समूहाशी हातमिळविणी करताना आम्ही अत्यंत भारावलेले आहोत. अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मीडिया आणि मनोरंजन उद्योगक्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणण्याची नमित यांची दूरदर्शिता अतुलनीय आहे. या धोरणात्मक भागीदारीमुळे समूहाचे नवी वाट निर्माण करणारे एआय सुसज्ज सीजीआय क्रिएटर ब्रह्मा विकसित करण्याच्या प्रक्रियेला उत्तम गती मिळणारच आहे, पण त्याचबरोबर नमित यांच्या नेतृत्वाखाली यातून कन्टेन्ट निर्मिती आणि वितरणासाठीचे अवघ्या जगाचा केंद्रबिंदू म्हणून अबु धाबीचे स्थान प्रस्थापित होणार आहे. प्रगत एआय तंत्रज्ञानांवर हुकुमत मिळवित आणि प्राइम फोकस स्टुडिओचा विस्तार करत आम्ही नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी व संपूर्ण युएई मध्ये लक्षणीय प्रमाणात नोकरीच्या संधी निर्माण करण्यासाठी सज्ज आहोत.”

 

डीएनईजी चे चेअरमन आणि सीईओ नमित मल्होत्रा म्हणाले, “माझी संपूर्ण कारकिर्द तंत्रज्ञानासह व्हिज्युअल क्रिएटिव्हिटीमध्ये गुंतवणूक करण्यातून व या क्षेत्राचे नेतृत्व करण्यातून आकाराला आली आहे. यूएएसजी बरोबरची आमची भागीदारी, ब्रह्माचे बाजारपेठेतील पदार्पण आणि आमच्या कन्टेन्ट निर्मिती मंचाला मिळालेले यश या सगळ्यालाच आमच्या तंत्रज्ञानाच्या ताकदीचे इंधन मिळाले आहे. जगभरात सर्वोत्तम सेवा पुरविण्याच्या बाबतीत नेतृत्वस्थानी असलेली कंपनी म्हणून आम्ही आमच्या बिझनेस मॉडेलची नवी व्याख्या बनवित आहोत, नवीनतम तंत्रज्ञान आणि निर्मिती क्षमतांचा वापर करून गोष्टी सांगण्याच्या कलेचा दर्जा उंचावत आहोत.”

 

“या गुंतवणूकीमुळे डीएनईजी समूहाच्या विद्यमान उपक्रमांना अधिक वेग मिळवून देईल आणि आम्ही पुरवित असलेल्या सेवा व आम्ही जिथे कार्यरत आहोत ती बाजारपेठ अशा दोन्ही संदर्भात आमच्या सेवांचा विस्तार करण्यास ग्रुपला अधिक सक्षम बनवेल. अबु धाबीमध्ये एक स्टुडिओ सुरू करून, कन्टेन्ट निर्मिती आणि तांत्रिक क्षमता या प्रांतामध्ये घेऊन येत आम्ही आमच्या यशाची उभारणी करत आहोत व तिथे स्वत:ला अग्रस्थानी प्रस्थापित करत आहोत ज्यामुळे आम्हाला जागतिक क्षमतांचा कधी नव्हे इतका लाभ घेणे शक्य होणार आहे.”

 

ब्रह्माचे एक्झेक्युटिव्ह चेअरमन प्रभू नरसिंहन म्हणाले, “ब्रह्मा या आम्ही विकसित करत असलेल्या सर्वात व्यापक, एआय – सुसज्ज फोटो रिअल सीजीआय क्रिएटरच्य साथीने प्रत्येक कथाकाराला आपल्या कल्पना वेगाने, स्वस्त दरांत आणि अधिक चांगल्या प्रकारे पडद्यावर उतरवण्यासाठी सुसज्ज बनविणे हे आमचे लक्ष्य आहे. येत्या महिन्यामध्ये आम्ही ब्रह्माच्या नेतृत्वदलाचा अधिक विस्तार करून, तंत्रज्ञान आणि एआय क्षेत्रातील सर्वोत्तम प्रतिभेची व्हिज्युअल इफेक्ट्स क्रिएटिव्ह्जशी सांगड घालू व ज्यांच्याकडे सांगण्यासाठी एक गोष्ट आहे अशा प्रत्येकाला ब्रह्मा

उपलब्ध करून देऊ.”

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments