Tuesday, September 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedविठू नामाचा गजर करीत बाल वारकऱ्यांची दिंडी आदर्श विद्यालय मराठी शाळेत रंगला...

विठू नामाचा गजर करीत बाल वारकऱ्यांची दिंडी आदर्श विद्यालय मराठी शाळेत रंगला पालखी सोहळा

पुणे : हातात पताका घेऊन टाळ-मृदुंगाचा गजर करणारे बाल वारकरी… पारंपरिक वेशात तुळशी वृंदावन हातात घेतलेल्या विद्यार्थीनी…दिंडीत लक्ष वेधून घेणारे ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती महाराज, मुक्ताबाई यांचा पेहराव केलेले विद्यार्थी… अशा आनंदमय वातावरणात विद्यार्थ्यांनी पालखी सोहळा साजरा केला. फुगड्या खेळत आणि विठू नामाचा गजर करीत विद्यार्थ्यांनी शाळेजवळील परिसरात दिंडी देखील काढली.

 

पालखी आगमनाच्या निमित्ताने शुक्रवार पेठेतील आदर्श विद्यालय मराठी शाळेत पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पारंपरिक वेशात विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. अभंग गात विद्यार्थ्यांनी रिंगण देखील केले. मुख्याध्यापिका नीलिमा लांजेवार यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. सर्व शिक्षकांनी कार्यक्रमाचे नियोजन केले

.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments