मुंबई, २ जुलै, २०२४: टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि. (टीपीईएम) या टाटा मोटर्सची उपकंपनी आणि भारतातील ईव्ही क्रांतीमधील अग्रणी कंपनीने आर्थिक वर्ष २५ ची सुरूवात उच्च स्तरासह केली आहे, जेथे कंपनीने घोषणा केली की कंपनीच्या एसयूव्ही पंच.ईव्ही आणि नेक्सॉन.ईव्ही ला भारत-एनसीएपीकडून प्रतिष्ठित ५-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले. उल्लेखनीय बाब म्हणजे,पंच.ईव्ही ला चाचणी करण्यात आलेल्या कोणत्याही भारतीय वेईकलमध्ये सर्वोच्च रेटिंग मिळाले. या निकालासह सर्व टाटा.ईव्ही एसयूव्ही भारत-एनसीएपीकडून ५-स्टार प्रमाणित आहेत
. टाटा मोटर्सचा भारतीय रस्त्यांवर सर्वात सुरक्षित वेईकल्स सादर करण्याच्या वारसाला पुढे घेऊन जात टाटा.ईव्ही पोर्टफोलिओ सूक्ष्मदर्शी ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करण्यासोबत सुरक्षिततेमध्ये देखील निपुण आहे. ईव्हींमधील वैशिष्ट्ये सामान्यत: त्यांच्यावरील द्वितीय व तृतीय श्रेणीच्या विभागांमध्ये दिसून येतात, ज्यामधून भारतीय ग्राहकांना अपवादात्मक मूल्य मिळते. तसेच, सर्व टाटा.ईव्ही मॉडेल्सच्या व्हेरिएण्ट्समध्ये प्रमाणित म्हणून झेडकनेक्ट कनेक्टेड कार तंत्रज्ञान आहे.
पंच.ईव्ही ही टाटा.ईव्ही पोर्टफोलिओमधील नवीन ऑफरिंग आहे. टाटा.ईव्हीचे प्युअर ईव्ही आर्किटेक्चर acti.ev वर आधारित ही वैविध्यपूर्ण व बहुआयामी ईव्ही आहे, ज्यामध्ये आकर्षक, क्लासिकल एसयूव्ही डिझाइन आहे.पंच.ईव्ही मध्ये आर्केड. ईव्ही , एअर प्युरिफायर, एण्ड टू एण्ड एलईडी डीआरएल, तसेच वेलकम व गुडबाय फंक्शन, फ्रंक, सनरूफ, ऑल डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर आणि इन्फोटेन्मेंट यांसारखी सर्वोत्तम वैशिष्ट्ये आहेत. तसेच या वेईकलमध्ये प्रमाणित वैशिष्ट्ये म्हणून ६ एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम,आयएसओफिक्स, हिल होल्ड असिस्ट, रोल ओव्हर मिटीगेशन, आयटीपीएमएसआहे. निवडक व्हेरिएण्ट्समध्ये ३६० डिग्री कॅमेरा, ब्लाइण्ड स्पॉट व्ह्यू मॉनिटरिंग, एसओएस कॉलिंग, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेकसह ऑटो होल्ड, चारही डिस्क ब्रेक्स आणि हिल डिसेंट कंट्रोल अशी सर्वोत्तम वैशिष्ट्ये आहेत.
भारतातील ईव्ही क्रांतीची किकस्टार्टर नेक्सॉन.ईव्ही चे २०२० मध्ये लाँच झाल्यापासून ६८,००० हून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे. या वेईकलने डिजिअल ड्रायव्हिंग अनुभव देत बाजारपेठेत धुमाकूळ निर्माण केली आहे. या वेईकलमध्ये हार्मनची १२ इंच इन्फोटेन्मेंट स्क्रिन व ९-स्पीकर जेबीएल साऊंड सिस्टम असण्यासोबत एण्ड टू एण्ड एलईडी डीआरएल, वेलकम व गुडबाय फंक्शन, आर्केड.ईव्ही – अद्वितीय इन्फोटेन्मेंट अॅप स्टोअर आणि वेईकल टू वेईकल चार्जिंग व वेईकल टू लोड तंत्रज्ञान आहे, जे फक्त लक्झरी वेईकल्समध्ये आढळून येते. या वेईकलमध्ये प्रमाणित सुरक्षितता वैशिष्ट्ये आहेत, जसे ६ एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्रामसह आयव्हीबीएसी, आयएसओफिक्स , हिल होल्ड असिस्ट, रोल ओव्हर मिटीगेशन, आयटीपीएमएस आणि रिअर पार्किंग कॅमेरा. तसेच, निवडक व्हेरिएण्ट्समध्ये ३६० डिग्री कॅमेरा, ब्लाइण्ड स्पॉट व्ह्यू मॉनिटरिंग, एसओएस कॉलिंग, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेकसह ऑटो होल्ड, चारही डिस्क ब्रेक्स आणि हिल डिसेंट कंट्रोल अशी सर्वोत्तम वैशिष्ट्ये आहेत.
भारतातील सर्वात जलदपणे बुक करण्यात आलेली ईव्ही टिगॊर.ईव्ही ने इलेक्ट्रिक मोबिलिटीचे लोकशाहीकरण केले, तसेच ४-स्टार जीएनसीएपी प्रमाणित टिगॊर.ईव्ही लक्झरी व आरामदायीपणाचा अनुभव देते. या दोन्ही वेईकल्समध्ये सर्वोत्तम वैशिष्ट्ये आहेत जसे लेदरेट सीट्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, क्रूझ कंट्रोल, इलेक्ट्रिक ओआरव्हीएमसह ऑटो-फोल्ड आणि रेन-सेन्सिंग वायपर्स. सुरक्षिततेला अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. या वेईकल्समध्ये सुरक्षितता विषयक सर्वोत्तम वैशिष्ट्ये आहेत, जसे ६ एअरबॅग्ज, एबीएससह ईबीडी, हेडलॅम्प लेव्हलिंग, कॉर्नर स्टेबिलिटी कंट्रोल, सीटबेल्ट रिमाइंडर, रिअर पार्किंग कॅमेरा, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि इतर अनेक.
भारतीय ईव्ही बाजारपेठ सध्या विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि एकूण प्रवासी वाहन उद्योग विकासाला मागे टाकत आहे. कॅलेंडर वर्ष २०२३ मध्ये ईव्ही विभागाने ९० टक्क्यांहून अधिक वाढ केली, तुलनेत पीव्ही उद्योगाने ८ टक्के वाढीची नोंद केली. आर्थिक वर्ष २४ मध्ये ७४ टक्क्यांहून अधिक मार्केट शेअरसह टाटा.ईव्ही ने वार्षिक ४८ टक्क्यांची वाढ केली, ज्याचे श्रेय नवीन पंच.ईव्ही चे सादरीकरण आणि नेक्सॉन.ईव्ही मधील अपग्रेडेड गेमचेंजरला जाते. ईव्ही ड्राइव्ह करण्यामध्ये सुलभता, रेंजसंदर्भातील चिंतेचे निराकरण आणि चार्जिंग पायाभूत सुविधांमध्ये वाढ अशा घटकांमुळे ही वाढ झाली.


