Saturday, September 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedबीवायडी (BYD) इंडियाने आपली प्रवेशयोग्यता सुधारली आणि आपला उत्पादन पोर्टफ़ोलियो...

बीवायडी (BYD) इंडियाने आपली प्रवेशयोग्यता सुधारली आणि आपला उत्पादन पोर्टफ़ोलियो विस्तारित करत बीवायडी एटीटीओ ३ चा तीन नव्या श्रेणी सादरकेल्या असून, त्यांची इन्ट्रोडक्टरी एक्स-शोरूम किंमत ही भारतीय चलनात INR २४.९९ लाख असेल..

डायनॅमिक, प्रिमियम आणि सुपिरियर श्रेणींमुळे ग्राहकांना आपल्या वैयक्तिक जीवनशैलीमध्ये आपल्या आवश्यकतांनुसार निवड करता येऊ शकेल.

नव्या एटीटीओ -३ चे एडिशन नव्या कॉसमॉस काळ्या रंगामध्ये उपलब्ध असेल.

भारतीय चलनात इन्ट्रोडक्टरी एक्स-शोरूम किंमत ही INR २४.९९ लाख देऊन , बीवायडी इंडियाने बीवायडी एटीटीओ ३ चा मान राखला आहे.

नवी दिल्ली: बीवायडी इंडिया, भारताचा न्यु एनर्जी वेहिकल्स (एनईव्ही) या अग्रगण्य उत्पादन कंपनीची सबसिडरी असून, त्यांनी आपल्या उत्पादनांचा श्रेणींमध्ये वाढ करण्याचे जाहिर करत बीवायडी एटीटीओ ३ ही नवी श्रेणी सादर केली आहे. ही आकर्षक वीजेवर चालणारी एसयुव्ही आता कॉसमॉस काळ्या रंगामध्ये डायनॅमिक, प्रिमियम आणि सुपिरियर श्रेणींसह उपलब्ध असणार आहे, तसेच याचा हेतू हा उत्तम प्रवेशयोग्यतेसह ग्राहकांना आपल्या पसंतीचा श्रेणींमध्ये अधिक पर्याय उपलब्ध करून देणार आहे.

 

 

 

हा धोरणात्मक विकास बीवायडी एटीटीओ ३ चा मूळ उत्पादनांमध्ये ग्राहकांकडून मिळालेल्या उत्तम प्रतिसाद आणि आवडीचाच थेट प्रतिसाद आहे व याचे उद्दिष्ट हे विविध प्रकारचा ग्राहकांना आकर्षित करत संभाव्य खरेदी करणाऱ्यांना अधिक पर्याय मिळण्याचे आहे. नव्या बीवायडी एटीटीओ ३ ची श्रेणी ही डायनॅमिक पासून सुरू होत प्रिमियम आणि सुपिरियर श्रेणी पर्यंत जाणार आहे. डायनॅमिक श्रेणी ही इन्ट्रोडक्टरी एक्स- शोरूम किंमतीमध्ये भारतीय चलनात INR २४.९९ लाख ला उपलब्ध असेल , ज्यामुळे मोटरिंगचा अनुभव अधिक सहज आणि टिकाऊ बनेल.

 

 

 

प्रत्येक श्रेणी ही खूप लक्षपूर्वक बनविली असून ती बीवायडीचा भारतीय ग्राहकांचा गरजा पूर्ण करणारी असेल या शिवाय त्यांना ऑटोमोटिव रिसर्च असोसियेशन ऑफ़ इंडिया (ARAI) कडून प्रमाणित केले असेल. प्रिमियम आणि सुपिरियर श्रेणीने, ६०.४८ किलो वॅट क्षमतेस, ५२१ किमी* ARAI चाचणी पास केली आहे. डायनॅमिक मॉडेल, ४९.९२ किलो वॅट क्षमतेसह ४६८ किमी* ARAI चाचणी आणि ४१० किमी * NEDC चाचणी पास केली आहे. यामुळे बीवायडीची उत्तम प्रगतीशीलतेसह परिणामकारकता दर्शविणाऱ्या वाहनांप्रती असलेली बांधिलकी दिसून येते.

 

 

 

ARAI कडून मिळालेले होम्लोगेशन प्रमाणपत्र बीवायडी इंडियाची आपल्या ग्राहकांचा प्रती विश्वासार्हता आणि बांधिलकीची सुनिश्चिती करते. बीवायडी इंडिया २३ शहरांमधील २६ शोरूम्सपर्यंत वाढवत देशभरातील आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम दर्जाची सेवा प्रदान करण्यास बांधिल असेल.

 

 

 

श्री. राजीव चौहान, इलेक्ट्रिक पॅसेंजर वेहिकल (ईपीव्ही) व्यवसायाचे प्रमुख, बीवायडी इंडिया, म्हणाले, “ बीवायडी एटीटीओ ३ चा या तीन अतिरिक्त श्रेणी- डायमॅमिक, प्रिमियम आणि सुपिरियर – या आमचा करिता फ़ार महत्वाचा असून भारतातील इलेक्ट्रिक वाह क्षेत्रामध्ये एक मैलाचा दगड ठरणार आहे. यासह आम्ही ही वाहने कॉस्मो ब्लॅक कलर मध्ये घेऊन येत आहोत ज्यामुळे आमचा नवीन श्रेणीला एक उत्तम स्टाईल आणि रंग मिळणार आहे. आमचा विविधतेने नटलेल्या या उत्पादनांमुळे आमचा उत्पादन पोर्टफ़ोलियो अधिक चांगला तर दिसणार आहेच पण अधिक चांगल्या इलेक्ट्रिक वाहनांकरिता मार्ग देखील खुला केला आहे. अधिक मोठ्या प्रमाणातील ग्राहकांपर्यंत इलेक्ट्रिक गतीशीलता पोहोचावी हाच आमचा मानस आहे. आणि या तीन श्रेणींचा सादरीकरणामुळे आम्ही आमच्या दृष्टीक्षेपाचा अधिक जवळ जातो आहोत.”

 

 

 

बीवायडी एटीटीओ ३ चा तीन नव्या श्रेणी या अल्ट्रा-सेफ़ ब्लेड बॅटरीने युक्त असून, भारतातील इलेक्टिक वाहनांचा श्रेणींमधेल एक नवीन पर्व ठरणाऱ्या आहेत, यामुळे श्रेणी आणि सहजतेचा समतोल राखला जाईल. या श्रेणीमुळे ग्राहकांना ४९.९२ किलोवॅट किंवा ६०.४८ किलोवॅट अशा बॅटरी ची निवड करता येऊ शकेल. या इलेक्ट्रिक एसयुव्ही म्हणून जन्मला आलेल्या वाहनांचे ५० मिनिटांमध्ये ०% ते ८०% एवढे जलद चार्जिंग होते. याचे गतीमान बाह्य स्वरूप, आकर्षक आतील उपयुक्तता आणि आधुनिक वैषिठ्यांमुळे ग्राहकांना ही वाहने आवडतात तसेच यामध्ये ७ एअरबॅग्ज, पॅनरोमिक सनरूफ़ आणि ३६० ° होलोग्राफ़िक इमेजिंग सिस्टीम देखील त्यांच्या आवश्यकतांनुसार उपलब्ध करून दिली जातात ज्यामुळे बीवायडी एटीटीओ ३ च्या नवीन श्रेणी या मोटरिंगचा उत्तम पर्याय म्हणून ग्राहकांचा पसंतीस उतरते.

 

 

 

बीवायडी जागतिक स्तरावर आपल्या पाऊल खूणा उमटवित असून, जगभरात आकर्षक असा ७.३ दशलक्षाचा खप आहे. अभिमान असलेली फ़ॉर्च्युन ५०० कंपनी, बीवायडीने आपली बाजारातील ताकद दाखवत उत्तमतेशी असलेली आपली बांधिलकी देखील जपली आहे. कांतर ब्रॅन्ड्ज चा वॅल्युएबल ग्लोबल ब्रॅन्ड्स २०२४ चा अहवाला नुसार बीवायडीने जगातील पहिल्या १० ऑटोमोटिव ब्रॅन्डसमधील आपले नाव राखले असून, आपल्या ब्रॅन्डची किंमत ही अमेरिकन चलनानुसार US$10 अब्जापर्यंत नेली आहे, ज्यामुळे ग्राहकांचा या ब्रॅन्ड प्रती असलेला विश्वास दिसून येतो. कंपनी आपल्या हरित भविष्याचा ध्येयाकडे देखील जलद गतीने मार्गक्रमण करत असून ‘Cool the Earth by 1°C’ ब्रीदाप्रती आपली बांधिलकी जपते आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments