बेंगळुरू,- ग्लेनईगल्स बीजीएस हॉस्पिटल, बेंगळुरू येथे यशस्वी दुहेरी फुफ्फुस प्रत्यारोपण करत रुग्णालयाने आपली एक नवी ओळख निर्माण केली. रुग्णाला घरी सोडण्यात आसे असून तो आता पूर्णपणे बरा झाला आहे आणि दैनंदिन कामांनाही सुरुवात केली आहे.
६२ वर्षीय श्री आनंद कुमार हे इंटरस्टिशियल लंग डिसीज/फुफ्फुसांच्या फायब्रोसिसने ग्रस्त होते. अनेक महिन्यांपासून ते ऑक्सिजन सपोर्टवर अवलंबून होते, त्यांना विश्रांतीच्या वेळीही देखील सतत ऑक्सिजनची गरज भासत होती आणि कमीतकमी परिश्रमाने दम लागण्याचा अनुभव येत होता. प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षा कालावधीत, ऑक्सिजनची गरज वाढल्यामुळे आणि छातीत संसर्ग झाल्यामुळे त्याला महिन्यातून दोनदा रुग्णालयात दाखल करावे लागले. सुदैवाने, योग्य कॅडेव्हरिक डोनर वेळेत उपलब्ध झाला. प्रत्यारोपणानंतर रुग्ण त्वरीत बरा झाला आणि शस्त्रक्रियेनंतर अवघ्या 14 दिवसांनी त्याला घरी सोडण्यात आले.
डॉ अपार जिंदाल(संचालक – हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण कार्यक्रमाचे प्रमुख) यांच्या नेतृत्वाखाली फुफ्फुस प्रत्यारोपण करण्यात आले. आमचा बहुविद्याशाखीय दृष्टीकोन आणि रुग्ण सेवा तसेच रुग्णांच्या काळजीसाठी असलेली अतूट बांधिलकी यामुळे यशस्वी उपचारांची सांगड घालता आल्याची प्रतिक्रिया डॉ बालसुब्रमणि गोविनी(संचालक, एचओडी कार्डिओथोरॅसिक अँड व्हॅस्कुलर सर्जरी (CTVS) आणि हार्ट लंग ट्रान्सप्लांट) यांनी व्यक्त केली. डॉ गोविनी यांच्या नेतृत्वाखालील सर्जिकल टीमने यशस्वी उवचैर केले. डॉ गोविनी सांगतात की, आमच्या रुग्णावर यशस्वी उपचार करणे हे जागतिक दर्जाची सेवा प्रदान करण्यासाठी आणि वैद्यकीय उत्कृष्टतेच्या सीमा पाश्चात्य मानकांच्या बरोबरीने करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. रूग्णांच्या काळजीसाठी डॉ. शुभम शर्मा(ट्रान्सप्लांट पल्मोनोलॉजिस्ट )आणि डॉ. मंजुनाथ पी. एच.(इंटरव्हेंशनल पल्मोनोलॉजिस्ट) यांचे कौशल्य आणि समर्पण होते.
बेंगळुरूच्या ग्लेनईगल्स हॉस्पिटल्सचे क्लस्टर सीईओ बिजू नायर सांगतात की अवयव दानाविषयी जागरूकता वाढवण्याचे गरजेचे आहे. अवयवदानाची वाढती गरज आणि त्याचा रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांवर होणारा परिणाम अधोरेखित करते. मी सर्व डॉक्टर, कर्मचारी आणि परिचारिकांचे त्यांच्या अविरत कार्यासाठी मनापासून आभार मानतो.
दुहेरी फुफ्फुस प्रत्यारोपणाच्या रुग्णावर केलेले यशस्वी उपचार हे ग्लेनईगल्स बीजीएस हॉस्पिटल, बंगळुरूच्या वैद्यकीय प्रगतीसाठी आणि अतुलनीय आरोग्य सेवा उपचार प्रदान करण्याचे रुग्णालयाचे मुख्य उद्दिष्ट्य साध्य
करते.


