Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedचौथ्या पीवायसी - रिअल्टी सेव्हन चेस लीग स्पर्धेत गोल्डन किंग्ज संघाला विजेतेपद

चौथ्या पीवायसी – रिअल्टी सेव्हन चेस लीग स्पर्धेत गोल्डन किंग्ज संघाला विजेतेपद

पुणे, दि.15 जुलै 2024 – पीवायसी हिंदू जिमखाना आयोजित चौथ्या पीवायसी – रिअल्टी सेव्हन चेस लीग स्पर्धेत अंतिम फेरीत गोल्डन किंग्ज संघाने वाडेश्वर विझार्ड्स संघाचा 4.5-2.5 असा पराभव करत विजेतेपद संपादन केले.

 

पीवायसी जिमखाना येथील बुद्धिबळ संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत गोल्डन किंग्ज संघाने वाडेश्वर विझार्ड्स संघाचा 4.5-2.5 असा पराभव केला. वाडेश्वर विझार्ड्स च्या रोहित देवलने गोल्डन किंग्जच्या किरण खरेचा पराभव 1-0 असा पराभव करून संघाचे खाते उघडले. त्यानंतर गोल्डन किंग्जच्या निरंजन गोडबोलेने वाडेश्वर विझार्ड्सच्या यश मेहेंदळेचा 1-0 असा पराभव करून संघाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर अभिषेक गोडबोले व रोनित जोशी यांच्यातील लढत बरोबरीत सुटली. चौथ्या पटावरील लढतीत गोल्डन किंग्जच्या शुभंकर मेनन याने वाडेश्वर विझार्ड्सच्या अमोल मेहेंदळेचा 1-0 असा तर, पाचव्या पटावरील लढतीत गोल्डन किंग्जच्या सावन रायसोनीने निशाद चौघुलेचा 1-0 असा पराभव करून संघाला आघाडी मिळवून दिली. सहाव्या पटावर गोल्डन किंग्जच्या भार्गव आठवलेने अनंत सहस्रबुद्धेचा 1-0 असा पराभव करून संघाला विजयी आघाडी प्राप्त करून दिली. अखेरच्या पटावरील लढतीत किंग्जच्या इंद्रनील मांडकेला वाडेश्वर विझार्ड्सच्या वंदित मेहताने 0-1 असे पराभूत केले.

 

स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण ध्यानचंद पुरस्कार विजेते ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे, पीवायसी हिंदू जिमखानाचे खजिनदार चंद्रशेखर नानिवडेकर, क्लबच्या चेस विभागाचे सचिव शिरीष साठे, क्लबच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य दिपक गाडगीळ, रिअल्टी सेव्हनचे व्यवस्थापकीय संचालक कपिल त्रिमल, आमोद प्रधान यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इंटरनॅशनल आरबीटर अथर्व गोडबोले आदी मान्यवर उपस्थित होते.

 

निकाल: अंतिम फेरी:

गोल्डन किंग्ज वि.वि.वाडेश्वर विझार्ड्स 4.5-2.5 (किरण खरे पराभुत वि.रोहित देवल 0-1; निरंजन गोडबोले वि.वि.यश मेहेंदळे 1-0; अभिषेक गोडबोले बरोबरी वि.रोनित जोशी 0.5-0.5; शुभंकर मेनन वि.वि.अमोल मेहेंदळे 1-0; सावन रायसोनी वि.वि.निशाद चौघुले 1-0; भार्गव आठवले वि.वि.अनंत सहस्रबुद्धे 1-0; इंद्रनील मांडके पराभुत वि.वंदित मेहता 0-1;

 

इतर पारितोषिके:

सर्वोत्कृष्ट खेळाडू(महिला): अलिशा पै(किंग्ज 64);

सर्वोत्कृष्ट खेळाडू(पुरुष): सावन रायसोनी(गोल्डन किंग्ज);

सर्वोत्कृष्ट कुमार खेळाडू: रोहिन लागु(किंग्ज 64):

सर्वोत्कृष्ट वरिष्ठ खेळाडू: अनंत सहस्रबुद्धे(वाडेश्वर विझार्ड्स

)

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments