Monday, September 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedमनावर नियंत्रण ठेवण्यासाठी लोभ आणि अहंकारपासून लांब रहा* ...

मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी लोभ आणि अहंकारपासून लांब रहा* *डॉ.पंकज उर्फ चेतनानंद महाराज यांची प्रवचनमाला*

 

 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट तर्फे चातुर्मास प्रवचन दिवस दुसरा :

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजन

 

पुणे : शरीराला काही विकार असतात तसेच मनाला देखील असतात. पूर्वी दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणारे लोक होते. परंतु आता स्वतःच्या दुःखावर देखील लोक काम करत नाहीत त्यामुळे आत्महत्येचे प्रमाण वाढू लागले आहे. आज अशी परिस्थिती आहे की दुसऱ्यांचे सुख पाहून अनेकांना हिमालयाएवढे दुःख होते. हे योग्य मार्गावर आणण्याचे काम संतांनी केले. आपल्यामध्ये खूप अहंकार आहे, तो संपवण्यासाठी संतांजवळ जायला पाहिजे. मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी लोभ आणि अहंकार दूर ठेवायला पाहिजे. असे मत श्री क्षेत्र भंडारा डोंगर जगद््गुरुकृपांकित डॉ.पंकज उर्फ चेतनानंद महाराज यांनी व्यक्त केले.

 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे चातुर्मासानिमित्त आयोजित प्रवचन व कीर्तन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ज्ञानोबा-तुकोबांचे मानसशास्त्र या विषयावर ते बोलत होते. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

डॉ.पंकज उर्फ चेतनानंद महाराज म्हणाले, संताचे तत्वज्ञान आणि चरित्र हे शेवटी आपल्या मनापाशी येऊन थांबते. आपले मन किती समर्पित, शांत आणि स्थितप्रज्ञ आहे यावर लौकिक आणि पारलौकिक दोन्ही जगाचे यश-अपयश अवलंबून आहे. मनाला निर्माण झालेली वासना समजून घ्या नाहीतर तुमचा अंत आहे, असेही त्यांनी सांगितले.

 

प्रवचनात श्री ज्ञानोबा-तुकोबांविषयी इतिहास व परंपरा, मानसशास्त्र, समाजशास्त्र, विज्ञान, पंढरी महात्म्य, नीतिशास्त्र, पसायदान याविषयी चेतनानंद महाराज निरुपण करणार आहेत. विश्व माऊली ज्ञानोबाराय व जगद्गुरु तुकोबाराय यांचे जीवन समृद्ध करणारे चरित्र व तत्वज्ञान यानिमित्ताने ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.

 

शनिवारपासून (दि. ३ आॅगस्ट) अनुक्रमे परळी वैजनाथ येथील ह.भ.प. भागवताचार्य तुकाराम महाराज मुंडे, परभणी मानवत चे ह.भ.प. उमेश महाराज दशरथे, मराठवाडयातील विदर्भ रथ ह.भ.प. रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर, देहू गाथा मंदिर येथील ह.भ.प. पांडुरंग महाराज घुले, आळंदी साधक आश्रमाचे ह.भ.प. यशोधन महाराज साखरे, जळगावचे ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, अहिरेगावचे ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे हे कीर्तन करणार आहेत. महोत्सवाला प्रवेश खुला असून प्रवचन, कीर्तनाचा भाविकांनी आनंद घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी केले आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments