Monday, September 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedरोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो तर्फे पूना स्कूल अँड होम फॉर ब्लाइंड...

रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो तर्फे पूना स्कूल अँड होम फॉर ब्लाइंड शाळेत नवीन इंटरॅक्ट क्लबची स्थापना

पुणे २५ जुलै २०२४ : रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो तर्फे कोरेगाव पार्क येथील पूना स्कूल अँड होम फॉर ब्लाइंड शाळेत नवीन इंटरॅक्ट क्लबची स्थापना करण्यात आली आहे. या स्थापना समारंभासाठी रोटरी युथ लीडरशिप अवॉर्ड्स (आरवायएलए) उपक्रमाचे डिस्ट्रिक्ट चेअर हे पद भूषविणारे रोटेरियन संजय करवा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रोच्या अध्यक्ष रोटेरियन अमिता नेने, पूना स्कूल अँड होम फॉर ब्लाइंड शाळेचे कार्यकारी अधिकारी विंग कमांडर कृष्णा शेवाळे,रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रोच्या माजी अध्यक्ष रोटेरियन सुरेखा देशपांडे, रोटेरियन भावना चाहुरे व रोटेरियन भालचंद्र जोशी उपस्थित होते.

 

पाहुण्यांचे स्वागत व राष्ट्रगीत झाल्यावर रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रोच्या अध्यक्ष रोटेरियन अमिता नेने यांनी मुलांना रोटरी बद्दल महिती दिली. त्यानंतर कॉलर व लेपल पिन देऊन इंटरॅक्ट क्लबची स्थापना करण्यात आली. नवीन इंटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष, सचिव व सहसचिव यांनी आपले विचार मांडले. शाळेच्या अध्यापिका हुमा शहा यांनी शाळेचे कार्यकारी अधिकारी विंग कमांडर कृष्ण शेवाळे यांची थोडक्यात ओळख करुन दिली. यानंतर विंग कमांडर शेवाळे सर यांनी आपले विचार मांडले.

 

माजी अध्यक्ष रोटेरियन अल्ताफ चिकोडी यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रमुख पाहुणे रोटेरियन संजय कारवा यांनी मुलांशी संवाद साधला. या कार्यक्रमाला शाळेतील विविध इयत्तेमधील सुमारे दीडशे विद्यार्थी उपस्थित होते.

मेट्रो क्लबच्या रोटेरियन अनघा जोशी यांनी सूत्रसंचालन व सचिव रोटेरियन राजस फडके यांनी आभार प्रदर्शन केले.

समारंभाच्या शेवटी मेट्रो क्लब तर्फे मुलांना खाऊ देण्यात आ

ला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments