कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणेतर्फे ‘ओळख देशभक्तांची शाळा तेथे क्रांती मंदिर.’ असे ९४८ दिवसांच्या परिक्रमेंतर्गत ‘२००० क्रांतिकारकांच्या छायाचित्रांचे भव्य प्रदर्शनाचे’ आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन बालगंधर्व आर्ट गॅलरी, पुणे येथे २ ते ४ ऑगस्ट २०२४ या कालावधीत सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी मोफत राहणार आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवार, दि.२ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११.१५ वा. होणार आहे. या समारंभासाठी साहित्यिका चंद्रलेखा बेलसरे, समाजसेवक जयंत जस्ते, भाषातज्ज्ञ संदीप नुलकर, वंदे मातरम संशोधक मिलिंद सबनीस, किशोर मासिकचे कार्य. संपादक किरण केंद्रे, न्यू इंग्लिश स्कूलचे चे पर्यवेक्षक सुरेश वरगंटीवार, रमणबाग प्रशालाच्या मुख्याध्यापिका चारूलता प्रभूदेसाई हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच सन्माननीय वीरामाता, वीरकन्या, वीरपुत्र व सेनादलातील माजी सैनिक योद्धे यांची विशेष उपस्थिती राहील.


