पुणे,5 ऑगस्ट 2024 : प्रख्यात शिक्षणतज्ञ डॉ.राकेश जैन यांनी अजिंक्य डीवाय पाटील युनिव्हर्सिटीच्या (एडीवायपीयू) कुलगुरूपदाची जबाबदारी स्विकारली आहे.त्यांनी 1 ऑगस्ट 2024 पासून पदभार स्विकारला आहे.
डॉ.राकेश जैन यांना उच्च शिक्षण आणि नेतृत्व भूमिकांसह शैक्षणिक आणि संशोधनामध्ये 38 वर्षांहून अधिक काळाचा समृध्द अनुभव आहे. विविध राज्यस्तरीय विकास समित्यांवरही त्यांनी काम केले आहे. ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरींगमध्ये पीएचडी,टाऊन प्लॅनिंग मध्ये एमई आणि बीई सिव्हिल इंजिनिअरींग अभ्यासक्रम पूर्ण केलेले डॉ.राकेश जैन हे वाहतूक,भू-तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि शहर नियोजन या विषयातील आपल्या कौशल्यासाठी प्रसिध्द आहेत.त्यांनी विविध पुस्तके लिहिली असून त्यांचे 150 हून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.
डॉ.राकेश जैन म्हणाले की,आपल्या वैशिष्टयपूर्ण शिक्षणपध्दती,नावीन्यपूर्ण संशोधन व अध्यापन आणि शैक्षणिक उत्कृष्टतेद्वारे समाजावर सकारात्मक प्रभावासाठी अथक प्रयत्न करत असलेल्या अजिंक्य डीवाय पाटील युनिव्हर्सिटी (एडीवायपीयू)चा भाग होणे हा माझ्यासाठी एक सन्मान आहे. एडीवायपीयूचे उत्कृष्टता,अभिनवता आणि सर्वसमावेशकता असलेल्या डिजिटली सक्षम संस्थेमध्ये परिवर्तन घडवून आणण्याची माझी दृष्टी आहे.आजच्या गतिमान काळात व डिजिटल युगात भरभराट होण्यासाठी आणि अधिक शाश्वत समाजासाठी योगदान देण्यासाठी विद्यार्थ्यांना ज्ञान व कौशल्याने सक्षम करणे अत्यावश्यक आहे.
नवीन कुलगुरूंचे स्वागत करताना अजिंक्य डीवाय पाटील युनिव्हर्सिटी (एडीवायपीयू) चे अध्यक्ष डॉ.अजिंक्य डीवाय पाटील म्हणाले की,डॉ.राकेश जैन हे आमच्या विद्यापीठाच्या
एका


