Friday, September 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedशासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन*

शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन*

 

पुणे, दि. ६: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह सासवड आणि २५० मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह पिंपरी- चिंचवड येथे प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

सामाजिक न्याय विभागाअंतर्गत या दोन्ही वसतिगृहात इयत्ता १२ वी नंतर महाविद्यालयीन प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर नोंदणी करुन भरलेल्या अर्जाची प्रत संबंधित वसतिगृहात ३० ऑगस्ट २०२४ पर्यंत जमा करावी. यापूर्वी कनिष्ठ महाविद्यालय व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी अर्ज केलेल्यांनी देखील या संकेतस्थळावर अर्ज करावेत.

 

वसतिगृह प्रवेश हा प्रवर्गनिहाय गुणवत्तेनुसार राहील. शासकीय वसतिगृहात विनामूल्य निवास, अंथरुण, पांघरुण, भोजन, पुस्तके, स्टेशनरी व इतर शैक्षणिक बाबींकरीता आर्थिक सहाय्य तसेच दरमहा निर्वाह भत्ता आदी सुविधा पुरविण्यात येतात, असे दोन्ही वसतिगृहाच्या गृहपालांनी कळविले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments