*
पुणे, दि. ४: एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन २०२३-२४ अंतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत राज्याच्याबाहेरील अभ्यासासाठी प्रक्षेत्र भेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आले असून इच्छुक शेतकऱ्यांनी १० जानेवारीपर्यंत तालुका कृषी अधिकारी किंवा उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांकडे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमांतर्गत राज्यातील फलोत्पादक शेतकऱ्यांसाठी तसेच शेतकऱ्यांमध्ये फलोत्पादन विषयक जिज्ञासा व आवड निर्माण करणे, फलोत्पादनाची प्रतवारी, हाताळणी, शेतस्तरावर प्रक्रिया उद्योग स्थापन करणे, फलोत्पादनाच्या विपणन व्यवस्थेचा अभ्यास करणे, आधुनिक लागवड तंत्रज्ञानाबाबत व काढणी पश्चात तंत्रज्ञानाबाबत सखोल शास्त्रोक्त ज्ञान उपलब्ध करून देणे व या माध्यमातून शेतकऱ्यांनी स्वतःची व त्याचबरोबर समूहाची फलोत्पादन विषयक उन्नती करणे यासाठी राज्याबाहेर प्रक्षेत्र भेट दौरा आयोजित करण्यात आला आहे.
या दौऱ्यात फळबाग, भाजीपाला, फुले लागवड, विदेशी फळपीक लागवड तसेच शेडनेटगृह व हरितगृह उभारणी, फळप्रक्रिया याबाबत आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली आहे.
0000