Friday, September 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedमाजी सैनिकांसाठी ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ उपक्रमाचे आयोजन

माजी सैनिकांसाठी ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ उपक्रमाचे आयोजन

 

 

पुणे, दि. ६: महसूल पंधरवडानिमित्त जिल्ह्यात जिल्हा सैनिक कल्याण मंडळाच्यावतीने सेवानिवृत्त सैनिक अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक पत्नी, विधवा, वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी व सेवारत सैनिकासाठी ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ या उपक्रमाचे १० ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वा. आयोजन करण्यात येणार आहे.

 

या उपक्रमाचे आयोजन तालुकास्तरावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत संरक्षण दलात कार्यरत असताना शहीद झालेल्या सैनिकांच्या अवलंबितांना व शौर्य पदक धारकांना, सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक असणारे विविध दाखले, प्रमाणपत्रे, घर व शेतीकरीता जमीन वाटपाबाबत प्रलंबित असलेल्या समस्या, प्रश्नांवर कार्यवाही करण्यात येणार आहे. प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात येणार आहेत.

 

तरी जिल्ह्यातील माजी सैनिकांनी ओळखपत्रासह दोन प्रतीत लेखी अर्ज घेऊन तहसील कार्यालयात उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.) यांनी केले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments