Friday, September 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedमुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत पुणे महानगरपालिकेकडून १६ ऑगस्ट रोजी मेळावा*

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत पुणे महानगरपालिकेकडून १६ ऑगस्ट रोजी मेळावा*

 

 

पुणे, दि.१४: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत गणेश कला क्रीडा मंच येथे १६ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वा. रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असून नोकरी इच्छुक अधिकाधिक उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे.

 

पुणे महानगर पालिकेच्या १३ विविध विभागात १ हजार १०० हून अधिक प्रशिक्षणार्थ्यांची या योजनेंतर्गत निवड करण्याकरीता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यात सहभागी होण्याकरीता उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. नोंदणीकृत विद्यार्थ्यांनी आपली कागदपत्रे सोबत घेऊन मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित रहावे.

 

या योजनेचा लाभ घेण्याकरीता उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवाशी तसेच वय किमान वय १८ व कमाल ३५ वर्ष असावे. तो १२ वी उत्तीर्ण, आयटीआय, पदविका, पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतलेला असावा. उमेदवाराची आधार नोंदणी असावी व उमेदवाराचे आधार संलग्न बॅंक खाते असावे.

 

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी हा सहा महिन्याचा राहणार असून उमेदवारांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे १२ वी उत्तीर्ण उमेदवारांना प्रतिमाह ६ हजार रुपये, आयटीआय, पदविकाधारकांना ८ हजार रुपये, पदवीधर, पदव्युत्तर अर्हताधारक उमेदवारांना १० हजार रुपये विद्यावेतन शासनामार्फत थेट उमेदवारांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. भोसले यांनी दिली आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments