Friday, September 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत अर्ज करण्यास...

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत अर्ज करण्यास मुदतवाढ*

 

 

पुणे,दि.१४: इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेत असलेल्या परंतु वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेली ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना’ आणि भटक्या जमाती- क संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘दीनदयाळ उपाध्याय स्वयंम’ योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

 

या योजनेअंतर्गत उच्च शिक्षण घेण्याऱ्या विद्यार्थ्यांना भोजन भत्ता, निवास भत्ता व निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांक संलग्न असलेल्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे. याअंतर्गत मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी प्रतिवर्षी ६० हजार रुपये, इतर महसुली विभागातील शहरे व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ५१ हजार रुपये, जिल्ह्याच्या ठिकाणी ४३ हजार तर तालुक्याच्या ठिकाणी ३८ हजार रुपयांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

 

या दोन्ही योजनांतर्गत उच्च शिक्षणाचे द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ वर्षाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना 30 सप्टेंबरपर्यंत तर प्रथम वर्षाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

 

विद्यार्थ्यांनी या योजनेचे अर्ज करण्यासाठी सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी रोड, पोलिस स्टेशनसमोर, येरवडा पुणे ०६ दूरध्वनी क्र.०२०- २९७०६६११ येथे संपर्क साधावा. तसेच सदर अर्ज महाविद्यालयांमध्येही उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत, असे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक विशाल लोंढे यांनी कळविले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments