Thursday, September 24, 2026
Google search engine
HomeUncategorized*जर्मनी देशातील बाडेन-युटेनबर्ग राज्यास* *महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरविण्याबाबत सामंजस्य करार*

*जर्मनी देशातील बाडेन-युटेनबर्ग राज्यास* *महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरविण्याबाबत सामंजस्य करार*

 

*ठाणे, दि.16(जिमाका) :-* दि.२५ फेब्रुवारी २०२४ रोजी जर्मनी देशातील बाडेन-युटेनबर्ग या राज्यास महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरविण्याबाबत सामंजस्य करार करण्यात आला. ज्यामध्ये वाहनचालकांचा समावेश असून या कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करण्यासाठी कार्यपध्दती निश्चित करण्याची जबाबदारी परिवहन विभागाकडे सोपविण्यात आलेली आहे.
याकरिता राज्यस्तरीय सनियंत्रण समितीमध्ये परिवहन आयुक्त हे सदस्य आहेत. तसेच उमेदवारांना आवश्यकतेनुसार कौशल्य वृध्दीसाठी अतिरिक्त प्रशिक्षण देण्यासाठी ट्रेडनिहाय तांत्रिक समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत. ज्यामध्ये परिवहन आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली वाहनचालक (बस रेल्वे, ट्रक, हल्की व जड वाहने) या ट्रेडकरिता समिती गठित करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर, शासन निर्णय क्र.कौशल्य २०२४/प्र.क्र.५१/एसडी-६, दि.११ जुलै २०२४ मधील कराराप्रमाणे वाडेड-बुटेनबर्ग या राज्यास कुशल वाहनचालक पुरविण्याची कार्यवाही परिवहन विभागामार्फत करण्यात येणार आहे. तसेच
उमेदवारास जर्मन भाषा येणे अनिवार्य असल्याने या जर्मन भाषा प्रशिक्षणाची कार्यवाही ही शासनामार्फत करण्यात येणार असून शासन निर्णयामध्ये दिल्यानुसार उमेदवारांचा सर्व खर्च हा शासन करणार आहे.
तसेच, जर्मनी व भारत या दोन्ही देशातील वाहनचालकांकरिता असलेले नियम व अभ्यासक्रम तसेच इतर अनुषंगिक यामध्ये तफावत असून उमेदवारास आवश्यक प्रशिक्षण (उदा. Left Hand Drive etc.) देण्याबाबतची कार्यवाही व खर्च देखील शासनस्तरावरुन होणार आहे, अशी माहिती ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दिली आहे.
0000000000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments