Thursday, September 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedमतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा (दुसरा) कार्यक्रम घोषित* ...

मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा (दुसरा) कार्यक्रम घोषित* *नागरिकांनी प्रारुप मतदारयादीमध्ये आपल्यासह* *कुटुंबातील व्यक्तींच्या नाव नोंदीची खात्री करावी*

 

 

 

ठाणे, दि.16(जिमाका) :- मा. भारत निवडणूक आयोगाकडील दि.०१ जुलै, २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा (दुसरा) कार्यक्रम घोषित केला आहे. या कार्यक्रमामध्ये मा. भारत निवडणूक आयोग व मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी दि.०१ ऑगस्ट, २०२४ रोजीच्या पत्रान्वये कळविल्याप्रमाणे सुधारीत कार्यक्रमाच्या अनुषंगाने दि.०६ ऑगस्ट,२०२४ रोजी ठाणे जिल्ह्यातील अठरा विधानसभा मतदारसंघात प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पुनरावृत्ती उपक्रम – दावे आणि हरकती दाखल करण्याचा कालावधी – सुधारित वेळापत्रक – दि.६ ऑगस्ट २०२४ (मंगळवार) ते दि.२० ऑगस्ट २०२४ (मंगळवार).

विशेष मोहिमेच्या तारखा – सुधारित वेळापत्रक – दि.१७ ऑगस्ट २०२४ (शनिवार) व दि.१८ ऑगस्ट २०२४ (रविवार).

i)दावे व हरकती निकाली काढणे, ii) आरोग्य मापदंड तपासणे आणि अंतिम प्रसिध्दीसाठी आयोगाची परवानगी घेणे, iii) डाटाबेस अद्यावत करणे आणि पुरवणीची छपाई करणे – सुधारित वेळापत्रक – दि.२९ ऑगस्ट २०२४ पर्यंत (गुरुवार).

मतदारयादी अंतिमरित्या प्रसिध्द करणे – सुधारित वेळापत्रक – दि.३० ऑगस्ट २०२४ (शुक्रवार) रोजी.

वरील नमूद वेळापत्रकाच्या अनुषंगाने नागरिकांना आवाहन करण्यात येते की, दि.०६ ऑगस्ट, २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदारयादीमध्ये आपले किंवा आपल्या कुटूंबातील व्यक्तींचे नाव समाविष्ट आहे अगर कसे ? याबाबत खात्री करावी. व १) ज्यांचे नाव मतदारयादीत समाविष्ट नाही, अशा नागरिकांनी मतदारयादीत नाव नोंदणी करण्याकरिता नमुना क्रमांक ६, २) ज्या नागरिकांचे मतदारयादीतील नाव, पत्ता, फोटो व इतर तपशिलाबाबत दुरूस्ती असल्यास नमुना क्रमांक ८ तसेच ३) एखादी व्यक्तो मयत / कायमस्वरुपी स्थलांतरीत असल्यास वगळणीबाबत नमुना क्रमांक ७ चे ऑफलाईन नमुना अर्ज हे विधानसभा मतदारसंघ कार्यालयात अथवा पदनिर्देशित ठिकाणी उपलब्ध होतील, तसेच https://voters.eci.gov.in या संकेतस्थळावर किंवा Voter Helpline App या अॅप वर देखील ऑनलाईन पद्धत्तीने भरता येतील.

तरी नागरिकांनी प्रारुप मतदारयादीमध्ये आपल्या नोंदीची खात्री करावी, असे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे व ठाणे उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी केले आहे.

000000000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments