🚩🚩 *मेळघाट साठी फिरत्या दवाखान्याच्या अँबुलन्सचा लोकार्पण सोहळा मा चंद्रकांत दादा पाटील आणि मा बच्चु कडू यांच्या उपस्थितीत पार पडला*
*भारतीय स्वातंत्र्यदिना निमित्त राष्ट्रीय सेवेसाठी मेळघाट मध्ये बॉर्डर लेस फौंडेशन च्या आणि एच डी एफ सी बँकेच्या सहकार्याने याचे आयोजन करण्यात आले होते*
*मेळघाट येथील आदिवासी बांधवांना त्यांचे वाड्या वस्त्यावर वैद्यकीय सेवा पुरवण्याच्या दृष्टिकोनातून अद्ययावत फिरता दवाखाना (मोबाईल मेडिकल युनिट)चे १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून लोकार्पण करण्यात आले*.
*मेळघाट सारख्या दुर्गम ठिकाणी तेथील आदिवासी बांधवांना वेळेवर वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत नाही. त्यामुळे त्यांना साध्या आजारांसाठी काही किलोमीटर डोंगर दऱ्यातून पायपीट करावी लागते*.
*वेळेवर उपचार मिळाला नाही तर त्यांना जीवही गमवावा लागतो , त्यांची ही दुरावस्था लक्षात घेता , रुग्णसेवेचे व्रतस्थ मा.ना.बच्चूभाऊ कडू अध्यक्ष दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई , त्यांच्या प्रेरणेने बोर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनचे अध्यक्ष अधिक कदम, विश्वस्त ॲड नरसिंग लगड आणि वैद्यकीय विभाग प्रमुख डॉ मनीषा पळसकर तसेच त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी हा उपक्रम यावर मार्ग काढण्याचा दृष्टीने हा प्रकल्प मेळघाट मधील २५ गावांमध्ये राबवण्याचे ठरवले*.
*मोबाईल मेडिकल युनिटमध्ये तज्ञ डॉक्टर असून रुग्णाची जागेवरच तपासणी करण्यासाठी आद्ययावत साधनांसह वैद्यकीय तपासणीची सोय आहे*. *गावोगावी जाऊन त्या ठिकाणीच रुग्णाची तपासणी करून त्या आधारे रुग्णाला जागेवरच औषधोपचार देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे*.
*ही सर्व सेवा रुग्णांसाठी विनामूल्य असून एखाद्या रुग्णाचा आजार गंभीर स्वरूपाचा असेल तर त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी अथवा नागपूर मुंबई येथे आवश्यक ती सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे*
*सदरचा कार्यक्रम मा.ना.चंद्रकांत दादा पाटील, पालकमंत्री अमरावती, यांच्या अध्यक्षतेखाली आणि मा. ना.बच्चुभाऊ कडू, अध्यक्ष, दिव्यांग कल्याण विभाग ,(राज्यमंत्री दर्जा.) यांच्या उपस्थितीत पार पडला*.
*यावेळी पालक मंत्र्यांनी संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक करून संस्थेचे जम्मू काश्मीर येथे चाललेले उपक्रमा बद्दलही आपुलकीने चौकशी करून त्याचा विशेष उल्लेख केला*.
*सदर मोबाईल मेडिकलचे युनिटचे काम एचडीएफसी सिक्युरिटीज बँकेचे सामाजिक दायित्व निधीतून (सी एस आर ) करण्यात आले असून*, *प्रस्तुत प्रकल्प बॉर्डरलेस वर्ड फाउंडेशन ( जम्मू आणि काश्मीर) या संस्थेच्या आणि सत्यशोधक बहुउद्देशिय शिक्षण संस्था यांच्या स्थानिक सहकार्यातून राबवण्यात येणार आहे*.
*या कार्यक्रमाच्या प्रसंगी संस्थेचे विश्वस्त ॲड. नरसिंग लगड, आ श्री राजकुमार पटेल मेळघाट धारणी, अमरावती, आ प्रवीण पोटे अमरावती, श्री. मयूर झंवर, विभागीय प्रतिनिधी एचडीएफसी सिक्युरिटीज नागपूर, सुहास दुसाने, तसेच अमरावती अतिरिक्त धर्मादाय आयुक्त संभाजीराव ठाकरे, कामगार उपायुक्त मंत्रालय, श्री निलेश देठे मुंबई . संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रकाश गोरे, सुमित कामडी आणि प्रकल्प समन्वयक राहुल म्हाला, सुषमा लष्करे*,*डॉ प्रतीक्षा सातपुरे आणि इतर मान्यवर व हितचिंतक यावेळी उपस्थित होते*. मेळघाट


