Thursday, September 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedसिध्दार्थ वाचनालय आणि ग्रंथालय तर्फे गुणवंत गौरव पुरस्काराने ग्रंथपाल दिन साजरा

सिध्दार्थ वाचनालय आणि ग्रंथालय तर्फे गुणवंत गौरव पुरस्काराने ग्रंथपाल दिन साजरा

पुणे,17 ऑगस्ट 2024 : कॅम्प येथील सिध्दार्थ वाचनालय आणि ग्रंथालय तर्फे दरवर्षीप्रमाणे विविध परीक्षांमध्ये नैपुण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि गुणवंतांना गुणवंत गौरव पुरस्कार देऊन ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला.आझम कॅम्पसमधील असेम्ब्ली हॉलमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डीवाय पाटील मेडिकल कॉलेज,पिंपरी चे अधिष्ठाता ब्रिगेडियर डॉ.उदयकुमार चिटणीस उपस्थित होते.याप्रसंगी सिध्दार्थ वाचनालय आणि ग्रंथालयचे अध्यक्ष बाळासाहेब शिवरकर,उपाध्यक्ष चंपालाल संघवी, कार्याध्यक्ष बापूसाहेब गानला,सचिव बाळकृष्ण सातपुते, कार्यकारी सदस्य डॉ. श्याम राजोरे व इतर सदस्य उपस्थित होते.

 

सिध्दार्थ वाचनालय आणि ग्रंथालय तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही कॅम्प परिसरातील शाळा व महाविद्यालयातील ४० गुणवंतांना गुणवंत गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ग्रंथमित्र श्री. दिलीप ल. भिकुले परिवार पुरस्कृत कै लक्ष्मणराव रामजी भिकुले ग्रंथभेट पुरस्कार हा शिवछत्रपती ग्रंथालय, मु. हिरपोडी, पो.पाबे, ता. वेल्हे, जि. पुणे यांना प्रदान करण्यात आला. तर जयहिंद वाचनालय, धामणी, आंबेगाव,पुणे चे ग्रंथपाल श्री. दिलीप रामभाऊ आळेकर यांना ग्रंथालय कर्मचारी पुरस्काराने गौरविण्यात आले.

 

व्यायाम आणि आहाराचे महत्व सांगताना डीवाय पाटील मेडिकल कॉलेज,पिंपरी चे अधिष्ठाता ब्रिगेडियर डॉ.उदयकुमार चिटणीस म्हणाले की निरोगी व सुदृढ आयुष्यासाठी शालेय जीवनात अभ्यासाबरोबर व्यायाम आणि आहार यांची सांगड घालणे गरजेचे आहे याबरोबरच पुस्तकांमधून मिळणारे ज्ञान, माहिती किंवा आशय हे कायमच स्मरणात राहत असते,म्हणूनच ऑनलाइन किंवा लॅपटॉपवर पुस्तक वाचण्याऐवजी कागदी स्वरूपातील पुस्तक वाचनाचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

 

आजच्या पिढीवर वाचनाच्या माध्यमातून संस्कार करण्यासाठी पुस्तकांशिवाय दुसरे प्रभावी माध्यम नाही. टीव्ही, मोबाईल, इंटरनेटच्या काळात नवी पिढी वाचनापासून दूर जात असल्याचे चित्र दिसते.वाचनसंस्कृती टिकावी आणि दिवसेंदिवस ती वृध्दींगत व्हावी यासाठी ग्रंथालयाचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचे मत सिध्दार्थ वाचनालय आणि ग्रंथालयचे अध्यक्ष बाळासाहेब शिवरकर यांनी व्यक्त केले.

 

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सचिव बाळकृष्ण सातपुते यांनी केले

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments