Thursday, September 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedडॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्रातर्फे अवयवदान दिनानिमित्त...

डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्रातर्फे अवयवदान दिनानिमित्त विविध उपक्रम तसेच अवयवदानाबाबत जागरुकतेवर भर

पुणे, ता. १६ ऑगस्ट २०२४ : डॉ. डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र, पिंपरी, पुणे येथील बहुअवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया विभागातर्फे अवयवदान दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांचा उद्देश अवयवदानाबद्दल जागरूकता वाढवणे, प्रत्यारोपण झालेल्या रुग्णांचा सन्मान करणे आणि जीव वाचवण्यासाठी अवयव प्रत्यारोपणाचे महत्त्व अधोरेखित करणे हा आहे. अवयवदान दिन दरवर्षी १३ ऑगस्ट रोजी जगभरात साजरा केला जातो. व्यक्ती आणि समाजावर अवयवदानामुळे होणारा प्रभाव अधोरेखित करण्यासाठी हा दिवस जगभरात पाळला जातो.

 

 

 

जागतिक अवयवदान दिनाचे औचित्य साधून संसथेच्या वतीने भिंतीचित्र, रांगोळी, गायन, पथनाट्य आणि लघुपट यांसारखे वैविध्यपूर्ण उपक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यात मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. यानिमित्त आयोजित वॉकथॉनमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी तसेच पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

 

 

अवयवदान दिन मोहिमेचा समारोप रविवारी (ता.११) डॉ. डी.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या हस्ते झाले. यावेळी झेडटीसीसी, पुणेच्या केंद्रीय समन्वयक आरती गोखले, सीव्हीटीएसचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख डॉ. अनुराग गर्ग, नेफ्रोलॉजी विभागाचे संचालक डॉ. तुषार दिघे, कार्यक्रमाच्या आयोजन समितीच्या अध्यक्ष डॉ. वृषाली पाटील, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी यकृत प्रत्यारोपण विभागाच्या प्रमुख आणि वरिष्ठ संचालक डॉ. नीलम मोहन, सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाचे संचालक प्रा. संजय नागराल उपस्थित होते. त्यांनी संवादात्मक चर्चेत सहभाग घेतला. अवयवदान आणि प्रत्यारोपणसाठीचे व्यवस्थापन , हृदय, फुफ्फुस प्रत्यारोपणाची मूलभूत तत्त्वे, मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या बातम्या आणि त्यातील मर्म, यकृत आणि स्वादुपिंड प्रत्यारोपणाचा विस्तार, लहान मुलांमधील यकृत प्रत्यारोपण आणि लहान बालकांच्या अवयव दानातील आव्हाने, भारतातील पाहिलेले आणि न पाहिलेले प्रत्यारोपण, अवयव दान आणि प्रत्यारोपण याबाबतचे विवाद, अवयव दात्याची काळजी आणि या क्षेत्रातील तत्वे अशा विविध विषयांवर सखोल चर्चा झाली.

 

 

 

या सत्रादरम्यान, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणेच्या प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील म्हणाल्या, “अवयवदान हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे कारण हे निस्वार्थ काम आहे. माझा ठाम विश्वास आहे की जीव वाचवण्यापेक्षा मोठी मानवता नाही. त्यामुळे जीवनदान देणारे हे कार्य मनाला स्पर्शून जाणारे आहे. असीम करुणा, दयाळूपणा आणि औदार्य यांचे हे प्रतीक आहे. मानवतेची व्याख्या याहून काही वेगळी असू शकत नाही. अवयव प्रत्यारोपण हे आधुनिक विज्ञानाच्या अनेक चमत्कारांपैकी एक आहे. डॉ. डी.वाय पाटील हॉस्पिटलमध्ये, आम्ही १८ फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केल्या असून, पुण्यातील ती सर्वात मोठी संख्या आहे. याशिवाय २०० हून अधिक मूत्रपिंड प्रत्यारोपण, ६१ यकृत प्रत्यारोपण, ८७ कॉर्निया प्रत्यारोपण, मूत्रपिंडासह स्वादुपिंड प्रत्यारोपण ३, हृदय प्रत्यारोपण ०४, हृदयासह फुफ्फुस प्रत्यारोपण ०४ अश्या अवयवांचे यशस्वीरित्या प्रत्यारोपण झाले आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून हा चमत्कार दररोज घडवून आणणाऱ्या सर्व वैद्यकीय तज्ज्ञांना मी सलाम करते. मला आमच्या अवयव प्रत्यारोपण टीम आणि क्रिटिकल केअर टीमचा अतिशय अभिमान वाटतो. ते अनेकांना जीवदान देण्यासाठी अथक मेहनत घेतात. ते यापुढेही त्यांचे कार्य याच उत्साहाने आणि समर्पित भावनेने सुरू ठेवतील आणि त्यांना उत्तम यश मिळत राहील.”

 

 

 

त्या पुढे म्हणाल्या, “ आपल्याला संपूर्ण देशात विविध माध्यमांतून अवयवदान आणि त्याचे महत्त्व याबद्दल जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. यांसारखे उपक्रम यासाठी उपयुक्त ठरतील. अधिकाधिक लोक या सामाजिक कारणासाठी पुढे येतील आणि अनेकांचा जीव वाचवण्यास मदत करतील, अशी आम्हाला आशा आहे. जेव्हा अधिकाधिक व्यक्ती आणि संस्था या चळवळीत सामील होतील, तेव्हा भारत अवयव दान आणि प्रत्यारोपणात अग्रगण्य देश बनू शकतो.”

 

 

 

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे (अभिमत विद्यापीठ) विश्वस्त आणि खजिनदार डॉ. यशराज पाटील, म्हणाले, “अवयवदान उपक्रमांना आपले कायदे पूरक आणि पाठबळ देणारे आहेत. मात्र, या उदात्त कामाला पाठिंबा देण्यासाठी सामाजिक आणि धार्मिक पातळीवर हा मुद्दा अधिक व्यापकपणे समजून घेणे आवश्यक आहे. यासाठी लोकांना संवेदनशील बनवणे, व्यापक यंत्रणेद्वारे एक भक्कम व्यवस्था विकसित करणे आणि वैयक्तिक प्रयत्नांतून प्रेरणा देण्याचे काम करणे ही काळाची गरज आहे. विविध उपक्रम, शिक्षण, जागरुकता आणि सामुदायिक सहभाग याद्वारे, आशावाद निर्माण करणे, जीव वाचवण्या

साठी

 

Previous article
Next article
RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments