Thursday, September 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedसंकटग्रस्त बालकांसाठी १०९८ हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वीत

संकटग्रस्त बालकांसाठी १०९८ हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वीत

पुणे, दि. २३ : कोणत्याही प्रकारच्या अडचणीत, संकटात सापडलेल्या तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या ० ते १८ वयोगटातील सर्व बालकांच्या त्वरित मदतीकरिता भारत सरकार, महिला व बाल विकास विभाग नवी दिल्ली आणि राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत चाईल्ड हेल्पलाईन सेवा १०९८ हा क्रमांक संपूर्ण महाराष्ट्रात कार्यान्वित आहे.

 

या सेवेअंतर्गत संकटग्रस्त बालकांना २४x७ हेल्पलाईन सेवा उपलब्ध आहे. या सेवेचा लाभ बालक स्वतः घेवू शकते किंवा इतर कोणीही या सेवेद्वारे बालकाला मदत मिळवून देऊ शकतात. १०९८ या टोल फ्री क्रमांकावरवर संपर्क साधून संकटग्रस्त बालकांना मदत करावी, असे आवाहन महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.

 

०००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments