Thursday, September 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedबालेवाडी येथे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त कार्यक्रमाचे गुरुवारी आयोजन*

बालेवाडी येथे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त कार्यक्रमाचे गुरुवारी आयोजन*

 

पुणे, दि.२८: क्रीडा व युवक सेवा संचालनालय व हॉकी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्ताने शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुगे बालेवाडी येथे गुरुवार २९ ऑगस्ट रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या सहायक संचालक भाग्यश्री बिले यांनी दिली आहे.

 

या कार्यक्रमासाठी राज्याचे क्रीडा आयुक्त डॉ. राजेश देशमुख, महाराष्ट्र पोलीस, फोर्स वनचे अतिरिक्त महासंचालक कृष्णप्रकाश, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सह संचालक सुधीर मोरे आदी उपस्थित राहणार आहेत.

 

या कार्यक्रमात ऑलिम्पिक खेळाडू राहुल सिंग, सुरेन्द्र कुमार, विक्रम पिल्ले, देवेद्र वाल्मिकी, आंतरराष्ट्रीय खेळाडू आकाश चिकटे, युवराज वाल्मिकी आदींचा सत्कार करण्यात येणार आहे.

 

या कार्यक्रमाअंतर्गत राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार प्रसार, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव, स्पर्धा आदी उपक्रम आयोजित केले जाणार असून जिल्ह्यात ७०० विद्यार्थ्यांची स्पर्धा आयोजन सत्कार समारंभ, १ हजार विद्यार्थ्यांकरीता क्रीडा रॅलीचे आयोजन नाना पेठ खुल सभागृह येथे करण्यात आले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments