Thursday, September 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedमंगळवारी सिम्बायोसिस विद्यापीठ लवळे परिसरात शाळा बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश*

मंगळवारी सिम्बायोसिस विद्यापीठ लवळे परिसरात शाळा बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश*

 

 

पुणे, दि. २८: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टीने ३ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजल्यापासून ते दुपारी १ वाजेपर्यंत सिम्बायोसिस विद्यापीठ लवळे परिसरातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत.

 

राष्ट्रपतींच्या दौऱ्यांच्या अनुषंगाने पुण्यातील पेरिविंकल इंग्रजी माध्यम शाळा सुस, डॉल्फिन इंग्रजी माध्यम शाळा तापकीर वस्ती, विद्या व्हॅली शाळा सुस, श्रीनिवास प्रि-स्कूल, नानासाहेब ससार इमारत सुस, आदित्य प्रि-स्कू, पारखे वस्ती सुसगांव, पोद्दार जंबो किड्स सुसगाव, ट्री हाऊस माध्यमिक शाळा, पारखे वस्ती सुसगांव, ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल सुस, जिल्हा परिषद शाळा सुसगाव कमान, संस्कारोदय प्राथमिक शाळा, शितळादेवीनगर, लिटील बेरीएस प्रि-स्कूल, ठकसेन नगर, किड्झी प्रि-स्कूल, श्री विद्या प्रि-स्कूल, सुसगाव व ध्रुव ग्लोबल स्कूल सिम्बायोसिस लवळे रोड, लवळे ता. मुळशी पुणे या शाळा बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments