पुणे, 10 जानेवारी २०२४ : १९१ वर्षांची समृद्ध परंपरा असलेल्या पीएनजी ज्वेलर्स तर्फे महाराष्ट्रातील लग्नसराईच्या काळासाठी प्रथा कलेक्शन सादर करण्यात आले आहे. प्रथा कलेक्शन हे केवळ आपल्या समृद्ध वारशाचा आणि कारागिरीचा उत्सव नाही तर आपल्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे. ‘प्रथा’ कलेक्शन हे नववधूंना डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आले असले तरी ते केवळ वधूपुरतेच मर्यादित नाही. हे कलेक्शन लग्नसराईशी संबंधित सर्व प्रसंगांसाठी वापरता येणार आहे. प्रथा कलेक्शन हे महाराष्ट्र व गोवा येथील पीएनजी ज्वेलर्सच्या सर्व दालनांमध्ये तसेच ऑनलाइन उपलब्ध असेल. हे कलेक्शन परंपरा आणि आधुनिकतेचे परिपूर्ण मिश्रण असलेल्या कालातीत सौंदर्याचे महत्त्व अंतर्भूत करते.
प्रथा कलेक्शन हे आपल्या जुन्या परंपरा व ग्रामीण कलाकुसर यांचा मिलाफ असून पिढ्यानपिढ्या सुरु असलेल्या दागिने बनवण्याच्या कलाकृतीतून व्यक्त होणारा आपला समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे. प्रथा कलेक्शन मध्ये भरजरी, नेकलेसेस, चोकर्स, आकर्षक हिऱ्यांचे दागिने, ईअर रिंग्स, रिंग्स,मांग टिका,कडा इत्यादींचा समावेश असून आधुनिक काळातील नववधूची आवड लक्षात घेऊन या दागिन्यांचे डिझाईन करण्यात आले आहे. साखरपुडा, हळदी समारंभ, संगीत, लग्न आणि स्वागत समारंभ अशा लग्नसराईशी संबंधित सर्व प्रसंगांसाठी प्रथा कलेक्शनमध्ये आकर्षक व कलात्मक सोन्याचे दागिने आहेत.
पारंपरिक रचनांदवारे प्रेरित क्लिष्ट डिझाईन्सपासून ते प्राचीन काळातील तंत्रांच्या समकालीन डिझाइन असलेले ,प्रथा कलेक्शन हे नववधूच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस दर्शविण्यासाठी तयार करण्यात आले आहे.
याप्रसंगी बोलताना पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले की, दागिने हा केवळ एक अलंकार नसून, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत आलेली परंपरा आहे व हेच आमच्या प्रथा कलेक्शन मधून प्रतिबिंबित होते. ‘टाइमलेस एलिगन्स’ ही संकल्पना या कलेक्शनमधील प्रत्येक दागिना परिभाषित करत आहे.आकडेवारीनुसार या लग्नाच्या मोसमात देशभरात ३० लाखांहून अधिक विवाह सोहळे संपन्न होण्याची अपेक्षा आहे. स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या दिवसाचे प्रतीक म्हणून आम्ही आगामी लग्नाच्या सीझनमध्ये हे ब्रायडल कलेक्शन सादर करत आहोत. आजच्या युवा पिढीतील जोडप्यांना परंपरांशी जोडून राहत आधुनिक विचार व्यक्त करायचे आहेत. त्यांना आजच्या काळातील फॅशन आणि शैलीच्या माध्यमातून व्यक्त व्हायचे असते.या कलेक्शनद्वारे आपल्या समृद्ध परंपरा व नात्यातील दृढता, प्रेम जपण्याचा प्रयत्न केला आहे.
खरेदीचा अनुभव अधिक चांगला बनविण्यासाठी पीएनजी ज्वेलर्स तर्फे आपल्या सर्व दालनांमध्ये व्हिजुअल मर्कंडायझिंग (व्हीएम) डिस्प्लेज प्रस्थापित करण्यात आले आहेत. ग्राहकांना त्यांना आपल्या गरजेप्रमाणे योग्य निवड करता यावी त्यासाठी याअंतर्गत सौंदर्य आणि कलाकुसर असलेल्या प्रथा कलेक्शन चे दागिने प्रदर्शित करण्यात येतील.


