Tuesday, September 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी -चिंचवड महापालिकेच्या वतीने थोर क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्त...

पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या वतीने थोर क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन-

पिंपरी, दि. ७ सप्टेंबर २०२४:- थोर क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात प्रजेला प्रमाण मानून इंग्रजांच्या विरोधात पहिली लढाई सुरू केली आणि त्यांच्या याच लढाईची प्रेरणा घेऊन पुढे अनेक क्रांतिकारकांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले. प्रभावी व्यक्तिमत्त्वाचा एक लढवय्या क्रांतिकारक म्हणून त्यांनी इंग्रजांविरुद्ध केलेला पराक्रम सर्वांनाच देशभक्तीची प्रेरणा देत राहील, असे मत अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले.

 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने थोर क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील प्रतिमेस अतिरीक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

 

यावेळी जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते आशिष जाधव, प्रशांत माकर, अक्षय तटले, अक्षय शिंदे, गणेश शिंदे, प्रतिक माकर, संजय शिंदे, मंगेश टिळेकर, आशा तटले, कल्पना माकर आदी उपस्थित होते.

 

थोर क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांचा जन्म पुण्यातील पुरंदर येथे झाला. उमाजीराजे यांनी वडील दादोजी नाईक यांच्याकडून युद्धकलेची शिकवण घेऊन त्यात प्राविण्य मिळवले.स्वातंत्र्यपूर्व काळात जेव्हा इंग्रजांचे अत्याचार वाढू लागले तेव्हा उमाजी नाईक यांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले,उमाजीराजे यांचे सैन्य डोंगरात हजारोंच्या टोळ्या करून वास्तव्य करीत असे. स्वातंत्र्यपूर्व काळात थोर क्रांतिकारक उमाजी नाईक यांनी देशभक्तीने प्रेरित झालेल्या हजारो युवकांची सशस्त्र फौज उभी करून इंग्रजांना आव्हान दिले.देशासाठी लढत असलेल्या उमाजी राजे यांना जनतेचीही साथ मिळाली. स्वतःचे प्रतिसरकार स्थापन करताना “इंग्रजांना कोणीही मदत करू नये तसे केल्यास नवीन सरकार त्यांना शासन करेल” असा जाहिरनामा प्रसिद्ध करून त्यांनी एकप्रकारे स्वराज्याचा पुकाराच केला होता. संपूर्ण क्रांतिकारकांचा इतिहासात अशा प्रकारचा व्यापक जाहिरनामा प्रथमच दिसून येतो.त्यांच्या प्रखर देशभक्तीची आणि व्यापक कार्याची दखल घेऊन त्यांची जयंती साजरी करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्यांची जयंती सर्व शासकीय कार्यालयात साजरी करण्यात येते.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments