Friday, August 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedकेप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडच्या वतीने नव्याने रचण्यात आली ग्रामीण महिला विकासाची व्याख्या:...

केप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडच्या वतीने नव्याने रचण्यात आली ग्रामीण महिला विकासाची व्याख्या: 7 राज्ये/प्रदेशातील 50,000 महिलांच्या जीवनावर प्रभाव

मुंबई, 10 जानेवारी 2024: केप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड ही अग्रगण्य नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी असून त्यांच्या परिवर्तनशील सीएसआर उपक्रमामार्फत महिला विकास आणि कौशल्य निर्मितीत नवचैतन्य आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात केप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडच्या मानवकल्याण शाखेने महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आसाम, नागालँड आणि मणिपूर येथील प्रतिथयश सामाजिक संघटनांसह भागीदारी करत महिलांच्या विकासाला हातभार लावत रु 392 लाखांची आकर्षक रक्कम जमा केली.

 

 

 

केवळ 2023-24 या आर्थिक वर्षात केप्रीच्या सीएसआर उपक्रमाने 50,000 हून अधिक महिलांचे सबलीकरण करत महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट राखत आगामी 5 वर्षांत अतिरिक्त 2 लाख महिलांपर्यंत पोहोचण्याचे ध्येय ठेवले. या उपक्रमाचे लक्ष्य सहज उपलब्ध आणि किफायतशीर वित्तीय सेवा, समुदाय-प्रणित मॉडेल आणि आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य देणाऱ्या उपक्रमाच्या माध्यमातून अडथळे बाजूला हटवून अधिकाधिक न्याय्य समाजाची निर्मिती करण्याचे आहे.

 

 

 

केप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश शर्मा यांनी वित्त, शिक्षण, स्रोत आणि सामाजिक नियमांमध्ये मर्यादित प्रवेश यासारख्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी कॉर्पोरेट, सरकार आणि नागरी समाज यांच्यातील प्रभावी सहकार्याच्या आवश्यकतेवर जोर दिला. ते म्हणाले की, स्त्री-पुरुष समानता, दारिद्र्य निर्मूलन आणि सर्वसमावेशक आर्थिक विकास साधण्यासाठी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणात गुंतवणूक करणे ही गुरुकिल्ली आहे.

 

 

 

केप्री ग्लोबलचा सीएसआर उपक्रम हा अंदाजे 40,000 महिला शेतकर्‍यांना सक्षम बनवण्याच्या दृष्टिकोनासह, 4 राज्ये/प्रदेशातील “शाश्वत कृषी उपजीविका” प्रकल्पांशी संबंधित असून शाश्वत शब्दासोबत प्रत्यक्ष नाळ जोडत आहे. पुनर्निर्मिती शेती, पोषणाच्या दृष्टीने संवेदनक्षम पद्धती आणि डिजीटल तंत्रज्ञान प्रशिक्षणाच्या माध्यमातून हा उपक्रम ग्रामीण भागांमध्ये उच्च आत्मविश्वास, आर्थिक स्वातंत्र्य आणि एकंदर कल्याणाची खातरजमा करतो.

 

 

 

केप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडच्या रोजगार उपक्रमाचे लक्ष संप्रेषण, व्यवसाय आणि जीवनावश्यक कौशल्ये, तसेच उत्तम रोजगार संधी आणि शाश्वत उत्पन्न वृद्धी 7000 लघु भूधारक महिला शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यावर आहे. त्यांना संधी उपलब्ध करून देण्याच्या हस्तक्षेपात पुनर्निर्मितीजन्य तसेच पोषणदृष्ट्या संवेदनशील शेती, पशु व्यवस्थापन, फळ बागा आणि नैसर्गिक स्रोत व्यवस्थापन (भू-विकास आणि सिंचन) यासोबत कृषी पर्यावरणीय पद्धतींच्या बृहद् तत्त्वांचा समावेश आहे.

 

 

 

समांतररित्या केप्री’चा सीएसआर उपक्रम स्थानिक महिला सहकारी संस्थांशी सहयोग करून त्याचा प्रभाव वाढवतो, एक लहरी प्रभाव निर्माण करतो जो केवळ अल्प भू-धारक महिला शेतकर्‍यांना पाठबळ देत नाही तर पर्यावरणीय टिकाऊपणाला देखील प्रोत्साहन देतो. पारंपरिक कृषी पद्धतींचा वापर, पारंपरिक पद्धतीने बियाणे प्रक्रिया आणि घन-जीवामृत सारख्या सेंद्रिय खतांचा वापर वाढवणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. गोमूत्र आणि कडुलिंब तेलाचे घरगुती मिश्रण मातीची उत्पादकता सुधारण्यासाठी आणि पर्यावरण विषयक जागरूकता वाढवून रसायन-मुक्त कृषी उत्पादने तयार करण्यासाठी वापरले जाते. फलोत्पादन उपक्रमाने माता आणि बाल आरोग्य सुधारण्यास देखील हातभार लावला आहे.

 

 

 

त्याशिवाय, या उपक्रमात महिला उद्योजकांना उद्योग तज्ज्ञ, बाजारातील घटकांशी जोडणाऱ्या मेंटॉरशीप प्रोग्रामचा देखील समावेश असून हा कौशल्यांचे आदान-प्रदान आणि व्यावसायिक वाढीकरिता साह्यकारी संपर्कजाळ्यांना चालना देणारा आहे. सामुदायिक समुहांची स्थापना ज्ञानाचे आदान-प्रदान करणारी सत्रे सुलभ करण्यासाठी, बाजारपेठेतील ट्रेंड आणि आधुनिक तंत्रांसह महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी केली जाते. हा उपक्रम व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांसोबतच्या भागीदारीचा लाभ घेत विशेष अभ्यासक्रम उपलब्ध करून देतो, ज्यामुळे महिलांचा विकास उद्योग मानकांनुसार होत राहील आणि त्यांच्याकरिता आर्थिक प्रस्तावांना चालना मिळेल.

 

 

 

केप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडचा बहुआयामी कल पारंपरिक सबलीकरण प्रयत्न, परस्पर जोडलेले शिक्षण, तंत्रज्ञान, मेंटॉरशीप आणि पर्यावरणीय शाश्वतता यापलीकडे विस्तारणारा आहे. या माध्यमातून अल्प-उत्पन्नधारक आणि वंचित ग्रामीण समुदायांच्या जीवनावर व्यापक परिणाम होईल.

 

 

 

समाजातील महिला, बालकं, तरूण आणि वंचित घटकांच्या आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य आणि रोजगार सबलीकरणाला प्राधान्य देत केप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडचा भर हा विविध शाश्वत विकास ध्येयांसह चांगले आरोग्य आणि तंदुरुस्ती, गुणवत्तापूर्ण शिक्षण, लिंगनिहाय समानता, चांगल्याप्रकारची कार्यालयीन आणि आर्थिक वृद्धीसह असमानता कमी करण्यावर आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments