पिंपरी- चिंचवड महापालिकेचे सहाय्यक आयुक्त सिताराम बहुरे यांना उपआयुक्त पदावर पदोन्नती देण्यास मान्यता

तारां कित Avatar

पिंपरी, दि. १० सप्टेंबर २०२४ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रिक्त असलेल्या पदावर उपआयुक्त पदी सीताराम बहुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त पदावरील अधिकाऱ्यांची शैक्षणिक अर्हता, अनुभव कालावधी, सेवाजेष्ठता, गोपनीय अहवाल, मत्ता व दायित्व, संगणक अर्हता, शिस्तभंग विषयक कारवाई हे सर्व सेवाविषयक तपशील पडताळून सीताराम बहुरे यांना शासन मान्यतेच्या अधिन राहून तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती देण्याच्या निर्णयास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समिती बैठकीत मान्यता दिली.

 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत असणारे सीताराम बहुरे यांची उपआयुक्त पदी पदोन्नती झाली असून ते सध्या फ क्षेत्रीय कार्यालयामध्ये क्षेत्रीय अधिकारी म्हणून कामकाज पाहत आहेत.

Tagged in :

तारां कित Avatar

More Articles & Posts