Tuesday, September 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedLEAD ग्रुपचा TECHBOOK भारतातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात क्रांती घडवण्यासाठी तयार ...

LEAD ग्रुपचा TECHBOOK भारतातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात क्रांती घडवण्यासाठी तयार 2028 पर्यंत भारतातील आघाडीच्या ५००० शाळा TECHBOOKS ला अपग्रेड करतील अशी अपेक्षा

नवी दिल्ली, १० सप्टेंबर २०२४: भारतातील सर्वात मोठी स्कूल एडटेक कंपनी LEAD ग्रुपने आज TECHBOOK सादर करण्याची घोषणा केली. TECHBOOK हे पारंपरिक पाठ्यपुस्तक-आधारित शिक्षणाला बदलण्यासाठी डिझाइन केलेले एक इंटेलिजंट बुक आहे. TECHBOOK आजच्या शालेय विद्यार्थ्यांमध्ये मुख्य शिक्षण आव्हानांवर उत्तर देण्यासाठी तीन अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि NCF अनुकूल अभ्यासक्रम सादर करते.

 

 

 

LEAD ग्रुपचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुमीत मेहता म्हणाले, “शतकानुशतके, वर्गखोल्यांमधील प्राथमिक शिक्षण साधन म्हणून पाठ्यपुस्तकात कोणताही बदल झालेला नाही. तर त्याचवेळी एआय आणि AR/VR ने जगाला वेगवेगळ्या उद्योगक्षेत्रात वैयक्तिकृत, बहुपद्धती आणि गेमिफाईड अनुभवांकडे नेले आहे. आम्ही आपल्या देशाच्या भविष्यासाठी भविष्यातून भविष्यासाठी काहीतरी आणले आहे. TECHBOOK हा तंत्रज्ञान, अध्यापनशास्त्र आणि अभ्यासक्रमातील अनेक वर्षांच्या संशोधनाचा एक क्रांतिकारी परिणाम आहे आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची पद्धत यामुळे कायमस्वरूपी बदलेल. 2028 पर्यंत, देशभरातली शाळेच्या वर्गांमध्ये वैयक्तिकृत आणि संवादात्मक शिक्षण हा मापदंड बनत भारतातील अग्रणी ५००० शाळा TECHBOOKS ला अपग्रेड करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे.”

 

 

 

TECHBOOK पारंपारिक पाठ्यपुस्तकांच्या मर्यादांना दूर करून वैयक्तिकृत आणि संवादात्मक शिक्षण अनुभव सादर करते. विविध शिक्षण स्तर असलेल्या वर्गखोल्यांमध्ये, TECHBOOK प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वैयक्तिकृत सूचना सक्षम करते. यामध्ये तीन शक्तिशाली वैशिष्ट्ये एकत्रितपणे आहेत:

 

ऑग्मेंटेड रिअॅलिटी: पारंपारिक 2D पाठ्यपुस्तकांमुळे विद्यार्थ्यांना मूलतः 3D स्वरूपातील जटिल संकल्पना समजून घेण्यात मर्यादा येतात. TECHBOOK विज्ञान आणि गणितासारख्या विषयांना ARI (ऑग्मेंटेड रिअॅलिटी इन्स्ट्रक्टर) सह प्रत्यक्षात आणते. त्यामुळे विद्यार्थ्यांना 3D मधील विषयांचा अभ्यास करता येतो.

 

वैयक्तिकृत वाचन प्रवाहीपणा: भाषाशिक्षणासाठी, TECHBOOK चा IRA (इंडिपेंडंट रीडिंग असिस्टंट) वैयक्तिक शिक्षकाच्या भूमिकेत काम करतो, तो विद्यार्थ्यांना पुस्तक वाचून दाखवतो. तसेच विद्यार्थ्यांच्या वाचनावर लक्ष ठेवून त्यांचे वाचनातील कौशल्य, प्रवाहीपणा आणि उच्चारांवर लक्ष ठेऊन तत्काळ योग्य त्या सूचना देतो.

 

 

 

वैयक्तिकृत सराव: PIE (पर्सनलाइज्ड इंटरएक्टिव्ह एक्सरसाइजेस) सह, विद्यार्थ्यांना सोडवता येतील असे अमर्यादित सराव प्रश्न मिळतात. त्यामुळे शिक्षण आनंददायी आणि सातत्यपूर्ण बनवत विद्यार्थी त्यांच्या स्वतःच्या गतीने विषयांचा अभ्यास करू शकतात.

 

सुमीत यांनी पुढे स्पष्ट केले, “पहिल्या वर्षात, TECHBOOKs देशातील आघाडीच्या ४०० नवनिर्माणाला प्रेरक शाळांसाठी ‘इनव्हाइट-ओन्ली’ प्रकारात उपलब्ध असतील. आम्हाला शिक्षणाचा एक नवीन मापदंड प्रस्थापित करायचा आहे आणि विद्यार्थी-केंद्रित पद्धतीने आणि शिक्षकांना सहाय्यकारी बनवून शाळांमध्ये AI आणि तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात भारत आघाडीवर आहे हे जगाला दाखवायचं आहे.”

 

 

 

LEAD ग्रुपच्या सह-संस्थापक आणि सह-मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता देओराह म्हणाल्या, “पाठ्यपुस्तके हातात घेऊन वाचण्याच्या स्पर्शीय अनुभवाला तंत्रज्ञानाच्या शक्ती आणि सखोल संशोधनपूर्ण शैक्षणिक आशयासोबत एकत्र करून प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा शैक्षणिक प्रवास खऱ्या अर्थाने सुधरवणारे उच्च-गुणवत्तेचे, वैयक्तिकृत शिक्षण मिळेल हे सुनिश्चित करत आहोत. TECHBOOK सोबत, आम्ही एक असे वातावरण निर्माण करत आहोत जिथे शिक्षण फक्त पाठांतरावर नाही, तर शोध, सृजनशीलता आणि कौशल्य मिळविण्याबाबत देखील असेल.”

 

 

 

श्री. मेहता पुढे म्हणाले, “शिक्षण आपल्या राष्ट्राच्या प्रगतीचा पाया आहे आणि शाळा या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी आहेत. TECHBOOK सह, आम्ही वर्गातील वैयक्तिकृत शिक्षणाची आणि शालेय विद्यार्थी पाठ्यपुस्तकांसह कसे संवाद साधतात याची नवीन व्याख्या करून देणाऱ्या शिक्षण सुविधेच्या श्रेणीची ओळख करून देत आहोत. हे शिक्षणाचे भविष्य आहे.”

 

 

 

गेल्या वर्षभरात, LEAD समूहाने उच्च-शुल्क असलेल्या शाळांपासून स्वस्त, परवडणाऱ्या शाळांपर्यंत भारतातील शाळांच्या संपूर्ण श्रेणींना सेवा देण्यासाठी आपल्या क्षमता वाढवल्या आहेत. उच्च-गुणवत्तेचे शिक्षण देण्यासाठी आणि शैक्षणिक उत्कृष्टता साध्य करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर शाळांना पाठबळ देण्यासाठी आपल्या योजना वाढवण्यावर या समूहाने लक्ष केंद्रित केले आहे. 2028 पर्यंत देशभरातील ६०,००० पेक्षा जास्त शाळांना उच्च-गुणवत्तेचे, स्कूल एडटेक सोल्यूशन्स प्रदान करण्याचे आपले उद्दिष्ट लवकर साध्य करण्याचा समूहाचा विचार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments