Tuesday, September 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedTATA.ev ईव्‍हींवरील अद्भुत किमतींसह साजरा करत आहे 'फेस्टिवल ऑफ कार्स'

TATA.ev ईव्‍हींवरील अद्भुत किमतींसह साजरा करत आहे ‘फेस्टिवल ऑफ कार्स’

मुंबई, सप्‍टेंबर १०, २०२४: TATA.ev या भारतातील इलेक्ट्रिक मोबिलिटी रिवॉल्‍यूशनच्‍या अग्रणी कंपनीने आपल्‍या ‘फेस्टिवल ऑफ कार्स’ सेलिब्रेशन्सचा भाग म्‍हणून Tiago.ev, Punch.ev आणि Nexon.ev या सर्वाधिक विक्री होणाऱ्या मॉडेल्‍सवर अभूतपूर्व किमतींची घोषणा केली आहे. ग्राहकांसाठी ईव्‍ही अधिक उपलब्‍ध होण्‍याजोगे करण्‍यावर लक्ष केंद्रित करत Nexon.ev साठी किंमत जवळपास ३ लाख रूपयांपर्यंत आणि Punch.ev साठी किंमत जवळपास १.२० लाख रूपयांपर्यंत कमी करण्‍यात आली आहे.

 

TATA.ev ग्राहकांना स्‍थानिकीकरण व तंत्रज्ञान सुधारणांचे फायदे देत आहे आणि गेल्‍या महिन्‍यात लाँच करण्‍यात आलेल्‍या Curvv.ev सह आयसीई किंमतीत समानता आणण्‍यामध्‍ये यशस्‍वी ठरली आहे. या स्‍पेशल ऑफरसह TATA.ev सर्वाधिक विक्री होणाऱ्या Nexon.evच्‍या किमती आयसीई मॉडेल्‍सच्‍या किमतीप्रमाणे सादर करत आहे, जे मर्यादित कालावधीसाठी आहे. याव्‍यतिरिक्‍त, Punch.ev आणि Tiago.ev वरील फेस्टिव्‍ह ऑफर्सनी देखील या वेईकल्‍सच्‍या किमती जवळपास त्‍यांच्‍या आयसीई काऊंटरपार्टसच्‍या किमती इतक्‍या केल्‍या आहेत. या आकर्षक किमतींव्‍यतिरिक्‍त, ग्राहकांना अत्‍यंत कमी कार्यसंचालन खर्च, शांतमय व आरामदायी ड्राइव्‍ह, तसेच वरील दोन श्रेणींमधील वैशिष्‍ट्यांचा आनंद घेण्‍याची संधी मिळेल.

 

ग्राहक देशभरातील ५,५०० हून अधिक टाटा पॉवर चार्जिंग पॉइण्‍ट्सपैकी कोणत्‍याही पॉइण्‍टवर ६-महिने मोफत चार्जिंगचा आनंद घेऊ शकतात, ज्‍यामुळे इंटर- व इंट्रा-सिटी प्रवास विनासायास, तसेच मोफत आनंद घेता येईल. ग्राहकांसाठी आकर्षक किमतींमध्‍ये त्‍यांची आवडती ईव्‍ही बुक करण्‍यासोबत मालक बनण्‍याची ही उत्तम वेळ आहे, जेथे ही स्‍पेशल फेस्टिव्‍ह ऑफर फक्‍त ३१ ऑक्‍टोबर २०२४ पर्यंत मर्यादित कालावधीसाठी उपलब्‍ध आहे.

 

या अभूतपूर्व सेलिब्रेशनची घोषणा करत टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि.चे चीफ कमर्शियल ऑफिसर श्री. विवेक श्रीवत्‍स म्‍हणाले, ”TATA.ev मध्‍ये आमचा अडथळ्यांना दूर करत आणि नियमित कार ग्राहकांसाठी ईव्‍ही अधिक उपलब्‍ध करून देत ईव्‍हींना मुख्‍य प्रवाहात आणण्‍याचा एकमेव उद्देश आहे. या स्‍पेशल, मर्यादित कालावधीच्‍या किमतींसह आम्‍ही ईव्‍हींचे मालक बनण्‍यासाठी उच्‍च खर्चाला कमी करत आहोत आणि ईव्‍हींच्‍या किमती जवळपास पेट्रोल आणि/किंवा डिझेलवर चालणाऱ्या वेईकल्‍सच्‍या किमती इतक्‍याच करत आहोत. ग्राहकांना आता आमच्‍या आधुनिक, उच्‍च-कार्यक्षम, शून्‍य उत्‍सर्जन आणि झीरो नॉइज ईव्‍ही ड्राइव्‍ह करण्‍याचा आनंद घेण्‍याची संधी आहे. या ईव्‍ही कमी कार्यसंचालन खर्च आणि ड्रायव्हिंगच्‍या वेळी आरामदायीपणा देतात. ग्राहकांना टाटा पॉवर चार्जर्स येथे पूरक सार्वजनिक चार्जिंग ऑफरिंग म्‍हणून देखील अतिरिक्‍त फायदा मिळेल. आम्‍ही ग्राहकांचे त्‍यांच्‍या जवळच्‍या टाटा मोटर्स आणि TATA.ev शोरूम्‍समध्‍ये स्‍वागत करण्‍यास उत्‍सुक आहोत, जेथे ते ईव्‍ही क्रांतीमध्‍ये सामील होतील.”

 

TATA.ev श्रेणीसाठी फेस्टिव्‍ह ऑफर्स

 

कार/एसयूव्‍ही

 

नवीन एण्‍ट्री किंमत

 

(लिमिटेड पीरियड ऑफर)

 

रूपयांमध्‍ये

 

किमतीमधील घट (जवळपास)

 

(व्‍हेरिएण्‍टनुसार)

 

रूपयांमध्‍ये

 

Tiago.ev

 

७,९९,०००*

 

४०,०००

 

Punch.ev

 

९,९९,०००

 

१,२०,०००

 

Nexon.ev

 

१२,४९,९००

 

३,००,००

 

 

 

 

* Tiago.ev एण्‍ट्री किंमत बदललेली नाही.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments